घरबिजनेसस्टिंग आता ‘एनर्जी ड्रिंक’नाही; FSSAI च्या नियमांनंतर पेप्सीकोचा निर्णय

स्टिंग आता ‘एनर्जी ड्रिंक’नाही; FSSAI च्या नियमांनंतर पेप्सीकोचा निर्णय

पॅकेजिंग व मार्केटिंगमध्ये मोठे बदल

भारतातील लोकप्रिय पेय ब्रँड स्टिंगच्या पॅकेजिंगमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या निर्देशानुसार पेप्सीको इंडियाने स्टिंगच्या बाटल्या आणि कॅनवरील ‘एनर्जी ड्रिंक’ हा उल्लेख हटवण्यास सुरुवात केली आहे. नियामकाने दिलेल्या मुदतीपूर्वीच कंपनीने नव्या लेबलसह उत्पादने बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

FSSAI ने स्पष्ट केले आहे की भारतीय अन्न मानकांमध्ये ‘एनर्जी ड्रिंक’ अशी कोणतीही अधिकृत श्रेणी नाही. त्यामुळे उत्पादनावर असा उल्लेख करणे किंवा पेयामुळे ऊर्जा वाढते, ताजेतवाने वाटते, एकाग्रता सुधारते अथवा थकवा दूर होतो, असे दावे करणे नियमांनुसार योग्य नाही. यामुळे सर्व संबंधित कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या लेबलिंग आणि जाहिरातींमध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
युद्धाच्या संकटात भारताची कमाई! जुलैमध्ये इंधन निर्यात वर्षभरातील सर्वोच्च स्तरावर

अभिजित दिपकेला तातडीने अटक करा! दिल्ली पोलिसांकडे तक्रार

शिक्षण, आरोग्य, समाजकारणातील युगाचा अंत; डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

अभिनेत्री तृषाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; उदयनिधी स्टॅलिन यांना घेतले ताब्यात
या निर्णयाचा परिणाम केवळ स्टिंगपुरता मर्यादित नसून रेड बुल, मॉन्स्टर, हेल एनर्जी आणि इतर कॅफिनयुक्त पेय उत्पादकांनाही आपल्या उत्पादनांवरील ‘एनर्जी ड्रिंक’ हा उल्लेख हटवावा लागणार आहे. कंपन्यांना FSSAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उत्पादनांची नव्याने वर्गवारी करून त्यानुसार पॅकेजिंग करावे लागणार आहे.

मात्र या बदलामुळे स्टिंग किंवा इतर कॅफिनयुक्त पेयांच्या विक्रीवर कोणतीही बंदी आलेली नाही. उत्पादनाचा फॉर्म्युला, चव किंवा गुणवत्ता यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून हा बदल केवळ पॅकेजिंग आणि लेबलिंगपुरता मर्यादित आहे. ग्राहकांना उत्पादनाबाबत अधिक स्पष्ट आणि पारदर्शक माहिती मिळावी, हा FSSAI चा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात कॅफिनयुक्त पेयांचा बाजार वेगाने वाढत असून कमी किमतीमुळे स्टिंगने विशेष लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे या निर्णयानंतर संपूर्ण पेय उद्योगाला नव्या नियमांनुसार लेबलिंग आणि मार्केटिंग धोरणात बदल करावे लागणार असून लवकरच ग्राहकांना ही उत्पादने नव्या स्वरूपात बाजारात पाहायला मिळणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version