घरक्राईमनामाकल्याण-टिटवाळा परिसरात अपहरणाच्या घटनांनी खळबळ

कल्याण-टिटवाळा परिसरात अपहरणाच्या घटनांनी खळबळ

२५ दिवसांत १३ जण बेपत्ता

कल्याण, टिटवाळा, आंबिवली आणि खडवली परिसरात गेल्या २५ दिवसांत १३ जण बेपत्ता झाल्याची प्रकरणे समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये अल्पवयीन मुली, महिला आणि कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या पुरुषांचा समावेश आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, काही प्रकरणांमध्ये अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत आपल्या नातेवाइकांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
टिटवाळ्याजवळील चौरे गावातील १३ वर्षीय विशाखा पाल ही दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडली होती; मात्र ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. त्याच परिसरातील दामिनी राजपूत ही तरुणीही घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली. खडवली येथील १७ वर्षीय गौरी गांगजी आणि टिटवाळ्यातील कशीश या तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनांनीही चिंता वाढवली आहे. याशिवाय, खडवली येथील भाग्यश्री थिगळे या कामावरून घरी परतत असताना आंबिवलीपर्यंत लोकलमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. एकनाथ पवार यांच्यासह काही पुरुषही बेपत्ता झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
हे ही वाचा:
‘व्होट चोरी’चा पुरावा मागितल्याने महिला पत्रकारावर मिरची स्प्रे

संपूर्ण दिल्लीतून बॅरिकेड्स हटवा, इंटरनेट आणि मेट्रो स्थानके सुरू ठेवा

दुष्काळग्रस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

सुटका होताच दिपकेची चीडचीड
एकाच परिसरात अल्पावधीत अनेक व्यक्ती बेपत्ता झाल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. या सर्व घटनांचा परस्पर संबंध आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्र तपास करून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांनीही सतर्क राहावे आणि कुटुंबातील व्यक्ती बेपत्ता झाल्यास विलंब न करता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version