घरक्राईमनामाअल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोन वेळा सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीवर एकाच रात्रीत दोन वेळा सामूहिक बलात्कार

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अत्यंत क्रूर घटनेमुळे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हादरली आहे. नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेली एक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अवघ्या काही तासात एकदा नाही तर दोन वेळा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

२९ जुलैच्या रात्री घरच्यांसोबत खटके उडाल्यामुळे ही १६ वर्षीय मुलगी घर सोडून बाहेर पडली. घर सोडल्यावर ती चालत मेडिकल चौक या ठिकाणापर्यंत पोहोचली. तिथे एक परिचित रिक्षाचालक तिला भेटले. त्या मुलीने रिक्षाचालकांना सीताबर्डी भागात सोडण्यास सांगितले. पण त्यांनी तिला मानस चौक या परिसरापर्यंत सोडले. मानस चौकात उतरल्यावर त्या मुलीवर आरोपी मोहम्मद रफीक आणि मोहम्मद शहनवाज उर्फ सना या दोघांची नजर पडली. हे दोघेही रिक्षाचालक होते. एकट्या मुलीला पाहून त्या दोघांची नियत फिरली. रात्रीचा फायदा घेत त्यांनी तिला मोमिनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

हे ही वाचा:

मराठीचे खरे मारेकरी…ही पेंग्विन सेना!

भारतीय महिला हॉकीपटूंची ऐतिहासिक कामगिरी! उपांत्य फेरीत धडक

…म्हणून साजरा झाला ‘मुस्लिम महिला हक्क दिन’

पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला मोठा पुरावा! संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?

त्यानंतर त्या मुलीला रिक्षेत टाकून न्यू रुग्णालय परिसरातील मेट्रो ब्रिज जवळ सोडले. तिथे त्यांनी या मुलीला या प्रकरणातील आणखीन एक आरोपी असलेल्या मोहम्मद मुशीर आणि त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीच्या स्वाधीन केले. या दोघांनीही त्या अल्पवयीन मुलीवर रिक्षातच बलात्कार केला

त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या पथकाला ही मुलगी नागपूर रेल्वे स्थानक परिसरात आढळली. तिची अवस्था पाहून तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडले आहे असे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्या मुलीला एका सामाजिक संस्थेच्या हवाली केले असून तिला आश्रयगृहात हलवण्यात आले. या आश्रयगृहात पीडित मुलीने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून आरोपी सना, तौसीफ, मुशिर आणि मोहम्मद नौशाद या चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version