घरक्राईमनामा‘जय श्री राम’चा नारा देण्यास नकार देणाऱ्या तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

‘जय श्री राम’चा नारा देण्यास नकार देणाऱ्या तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

दोघांचा शोध सुरू

‘जय श्री राम’चा नारा दिला नाही म्हणून परप्रांतीयांच्या एका टोळक्याने मराठी युवकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कांदिवलीमध्ये घडली आहे. या घटनेचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनाी दोन जणांना अटक केली असून इतर दोन जणांचा शोध अद्याप सुरू आहे.

मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरातील गोकुळनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. सिद्धार्थ किसन अंगुरे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. सिद्धार्थ कांदिवली पूर्व येथील क्रांतीनगरमध्ये राहत असून तो त्याच्या भावासोबत जात असताना चार परप्रांतीय युवकांनी त्याची वाट अडवली आणि त्याला ‘जय श्री राम’ म्हणायला सांगितले. सिद्धार्थने त्यास नकार देताच त्या युवकांनी सिद्धार्थ आणि त्याच्या भावाला शिवीगाळ केली. त्यानंतर त्या चार जणांनी सिद्धार्थला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर सिद्धार्थ याला रुग्णालयात नेण्यात आलं आणि नंतर त्याची तक्रार नोंदविण्यात आली.

हे ही वाचा:

न्यूयॉर्कमध्ये पूर; रस्त्यांना आले नद्यांचे रूप

‘इतरांकडून भाषण स्वातंत्र्य शिकण्याची गरज नाही’

पुणेकर सुनील देवधरांचे वाढदिवसानिमित्त प्रशांत कारुळकरांकडून अभिष्टचिंतन

इम्रान खानचे वकील आणि पीएमएल-एन सिनेटर यांच्यात टीव्ही शोमध्ये ठोसेबाजी

तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार जणांपैकी दोघांना अटक केली आहे तर फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी त्या चार जणांविरोधात कुरार पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज तिवारी (वय ३०) आणि रोशन उर्फ कबीर मिश्रा यांना अटक केली आहे. अरुण पांडे आणि राजेश रिक्षाचालक हे दोन आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या संपूर्ण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. २५ सप्टेंबरच्या रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version