घरक्राईमनामात्या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याला बेड्या

त्या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याला बेड्या

शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत ८ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या आहेत. एसीबीने त्यांना अटक केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे आजच त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.

दरम्यान, शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी ८ लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा पाय आणखी खोलात गेलाय. लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे कोट्यवधींची ‘माया’ असल्याचं समोर येतंय. विशेष म्हणजे शासनाने देखील शिक्षण आयुक्तांना वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. त्यामुळे आता शिक्षण आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.

आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर या सध्या फरार होत्या. त्यांनी आपली रवानगी तुरुंगात होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने ऍडव्होकेट अविनाश भिडे यांनी हा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी (१४ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींना निलंबित करा

कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?

लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर

दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’

शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी ८लाख रुपयांची लाच मागितली होती. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलंय. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version