घरदेश दुनियाभूतानमध्ये हिमनदी तलाव फुटला

भूतानमध्ये हिमनदी तलाव फुटला

आसाम, पश्चिम बंगालमध्ये पूरस्थितीचा धोका

भूतानमध्ये हिमनदीपासून तयार झालेल्या तलावाला अचानक भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे भारतातील आसाम आणि पश्चिम बंगालमधील काही भागांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. संकोश नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने दोन्ही राज्यांतील नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

भूतानच्या गासा जिल्ह्यातील वाकिला पर्वताच्या खाली असलेल्या शिंताफू हिमनदी तलावाला गुरुवारी संध्याकाळी भगदाड पडल्याचे वृत्त आहे. हा तलाव भूतानमधील संभाव्य धोकादायक १७ हिमनदी तलावांपैकी एक मानला जातो. तलावातील पाणी अचानक बाहेर पडल्याने परिसरात अचानक पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे भूतानमधील पुनाखा जिल्ह्यातील गुमागेव येथील डोचुखा-झोमलिंगथांग-रित्सा परिसरातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन प्रकल्पाचे अंशतः नुकसान झाले आहे. हा प्रकल्प बंद पडला असून, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. तसेच पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या मलब्यामुळे महामार्गाचा काही भागही अडवला गेला आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

हे ही वाचा:

नागपूर पदवीधर मतदार संघाने काँग्रेसची लाज राखली

मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

मॉस्कोच्या दिशेने युक्रेनचे ड्रोन हल्ले

‘JAI’च्या माध्यमातून हिंद-प्रशांतमध्ये सामरिक समीकरणांना बळ

भारतातील पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

भूतानमधून वाहणाऱ्या मो छू नदीच्या प्रवाहातून पुराचे पाणी पुढे संकोश नदीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार आणि आसाममधील धुबरीसह उत्तर बंगालमधील काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संकोश नदीच्या पाणीपातळीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version