घरक्राईमनामापश्चिम बंगालमधून जैशशी संबंधित आणखी एका संशयिताला अटक

पश्चिम बंगालमधून जैशशी संबंधित आणखी एका संशयिताला अटक

एसटीएफची कारवाई

- Advertisement -

पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असलेल्या प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक केली आहे. आदित्य सिंह उर्फ राज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला हावडा येथील राहत्या घरातून सोमवारी (३ ऑगस्ट) ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी एसटीएफने गेल्या आठवड्यात हामीम मंडल आणि त्याची कथित सहकारी अर्पिता सरकार यांना अटक केली होती. या दोघांची चौकशी केल्यानंतर आदित्य सिंहचे नाव समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हामीम मंडल आणि अर्पिता सरकार यांचे पाकिस्तानस्थित दहशतवादी-गुन्हेगारी नेटवर्क शहजाद भट्टी नेटवर्कशी कथित संबंध असल्याचा संशय आहे. हे नेटवर्क हनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग तसेच गरज पडल्यास अपहरण करून खंडणी उकळण्याच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

एसटीएफच्या प्राथमिक तपासात आदित्य सिंहने हामीम मंडलला भाजपचे आमदार उमेश राय आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी महत्त्वाची माहिती पुरवल्याचे समोर आले आहे. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, अलीकडील विधानसभा निवडणुकांनंतर उमेश राय यांना आलेल्या धमकीच्या फोनमागेही आदित्य सिंहचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. उमेश राय हे हावडा उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. ते राज्यमंत्री म्हणूनही काम पाहतात.

हे ही वाचा:

मोदींच्या व्हीडिओने गेमच फिरवला

रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्यास दंड!

तेल स्वस्त, बाजार मस्त! सेन्सेक्स ७९ हजारांच्या उंबरठ्यावर

पाकिस्तानात रॅलीवर आत्मघाती हल्ला

एसटीएफचे पथक रविवारी उशिरा रात्री आदित्य सिंहच्या घरी पोहोचले. त्याची रात्रभर चौकशी केल्यानंतर सोमवारी सकाळी त्याला औपचारिक अटक करण्यात आली. दरम्यान, गेल्या शुक्रवारी एसटीएफने हामीम मंडलला पूर्व बर्धमान जिल्ह्यातून अटक केली होती. त्याच रात्री झारखंडमधील साहिबगंज येथून अर्पिता सरकारलाही ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान हामीम मंडलकडून शुभेंदू अधिकारी यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक आणि हालचालींशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचा दावा एसटीएफने केला आहे. सध्या हामीम मंडल आणि अर्पिता सरकार हे दोघेही १४ दिवसांच्या एसटीएफ कोठडीत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version