घरक्राईमनामामंगळवार पर्यंत आर्यन खान तुरुंगातच

मंगळवार पर्यंत आर्यन खान तुरुंगातच

मुंबईच्या विशेष न्यायालयाने बुधवारी (२१ ऑक्टोबर) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता. आर्यन खानची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याची याचिका तातडीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, काल न्यायालयाच्या कामाची वेळ संपल्यामुळे त्यावर आज सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र, आता या याचिकेवर सुनावणी मंगळवारी होणार असून अजून चार दिवस आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आर्यन खानला मंगळवारच्या सुनावणीनंतर जामीन मिळतो का यावर सर्वांचेच लक्ष असेल.

आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आहे. दरम्यान आज सकाळीच अभिनेता शाहरुख खानने आपला मुलगा आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात भेट घेतली. सुमारे १० ते १५ मिनटे शाहरुख खानने तुरुंगात आर्यनची भेट घेतली. कोरोना काळात खबरदारी म्हणून कारागृहातील कैद्यांना भेटण्यास बंदी होती. मात्र, आजपासून हे सर्व निर्बंध शिथिल करून नियमांचे पालन करून कैद्यांना भेटण्याची नातेवाईकांना परवानगी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

हा भारताच्या संघ भावनेचा विजय

लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!

मिनी महाविकास आघाडीने केली घटनेची मोडतोड?

आर्यन खान सोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले होते. क्रूझवरील पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला अटक केली होती. क्रूझवरील ड्रग्स पार्टी उधळत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यातील तीन जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचा समावेश होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version