घरक्राईमनामासरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ला प्रकरण; पाच राज्यांत धाडी

सरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ला प्रकरण; पाच राज्यांत धाडी

एनआयएची मोठी कारवाई

सरकारी संकेतस्थळांना लक्ष्य करून सायबर दहशतवादी हल्ला घडवून आणल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) देशभरात मोठी कारवाई केली आहे. गुजरात सायबर टेररिझम प्रकरणाचा तपास करताना एनआयएने आज जुन्नर (पुणे, महाराष्ट्र) सह देशातील पाच राज्यांमधील पाच ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईदरम्यान हॅकिंगशी संबंधित डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

​५४ सरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ल्याचा कट

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करण्याच्या आणि लोकांमध्ये भीती पसरवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या तब्बल ५४ संकेतस्थळांवर अत्याधुनिक ‘डीडॉस’ (DDoS) हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) सुरुवातीला हा गुन्हा दाखल केला होता; त्यानंतर २५ जून २०२५ रोजी एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. या प्रकरणात यापूर्वीच दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींना तांत्रिक प्रशिक्षण, कौशल्य आणि मदत पुरवणाऱ्या संशयितांचा माग NIA ने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काढला. सक्षम न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळवल्यानंतर आज सकाळी खालील पाच ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली:

  • ​जुन्नर (पुणे, महाराष्ट्र)
  • ​नडियाद (खेडा, गुजरात)
  • ​रामागुंडम (करीमनगर, तेलंगणा)
  • ​गोपाळगंज (बिहार)
  • ​नवी दिल्ली

हे ही वाचा:

क्रिकेट पंचावर बॅटने हल्ला करणारा ३६ वर्षांनी पकडला

यशस्वी-असिथा मैदानात भिडले; दंड बसला!

‘खेलो इंडिया संवाद’चा मोदींशी महासंवाद

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल गेले बीजिंगला, सीमा वादावर तोडगा निघणार?

​लॅपटॉप, मोबाईलसह महत्त्वाचा डेटा जप्त

छापेमारीदरम्यान तपास यंत्रणेने ३ लॅपटॉप, ५ मोबाईल फोन, पेन ड्राईव्हसह इतर महत्त्वाची डिजिटल उपकरणे ताब्यात घेतली आहेत. या उपकरणांमध्ये हॅकिंगशी संबंधित संशयास्पद माहिती आढळली असून, संशयितांची मुख्य आरोपींशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्यात आली आहे. या आंतरराज्य सायबर हल्ल्याच्या कटाची पाळेमुळे शोधण्यासाठी एनआयएकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version