घरक्राईमनामाममतांच्या भावाची पुतण्या अभिषेक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

ममतांच्या भावाची पुतण्या अभिषेक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगाविरोधात जनतेला भडकवल्याचा आरोप

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे धाकटे बंधू स्वपन बॅनर्जी ऊर्फ बाबुन यांनी त्यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार व राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांविरोधात जनतेला भडकवणारी विधाने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी अभिषेक यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

स्वपन बॅनर्जी यांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) कोलकात्यातील कालीघाट पोलीस ठाण्यात सात पानी लेखी तक्रार दिली. अभिषेक यांनी न्यायपालिका, कलकत्ता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत केलेल्या कथित विधानांचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. अभिषेक यांच्यावर धमकी देणे, न्यायालयीन कामकाजाशी संबंधित सार्वजनिक सेवकांचा अपमान करणे आणि घटनात्मक संस्थांविरोधात जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करणे, असे गंभीर आरोप स्वपन यांनी केले आहेत.

या तक्रारीसाठी स्वपन यांनी अभिषेक यांच्या ७ नोव्हेंबर रोजीच्या फेसबुक व्हिडीओचा, अलीकडे प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांचा तसेच २४ सप्टेंबर रोजी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टचा आधार घेतला आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक यांनी न्यायव्यवस्थेतील काही घटक भाजपच्या बाजूने झुकलेले असल्याचा आरोप केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केल्याचाही उल्लेख आहे. या विधानांमुळे न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो, असा दावा स्वपन यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

नोकरीची संधी देत टेस्लाकडून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना

कॅनडातील टोरंटो विमानतळावर विमान उलटले; १८ प्रवासी जखमी

ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

युवा लेखक म्हणून विवान कारुळकरला वर्ल्ड रेकॉर्ड्स विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट

दरम्यान, अभिषेक यांच्या काही विधानांवरून कलकत्ता उच्च न्यायालयाने १७ नोव्हेंबर रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतरही त्यांनी न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या विधानांवर माघार घेतली नसल्याचा आरोप स्वपन यांनी केला आहे.

पूर्वीचा लेख

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version