देशात संविधान बचाओच्या हाकाट्या पिटणारे, हिंदूंच्या संवैधानिक अधिकारांचा प्रश्न येतो तेव्हा लोकशाही गाडायलाही तयार होतात. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने अरुल्मिगु सुब्रमण्य स्वामी मंदीराच्या तिरुप्परनकुद्रंम टेकडीवर दिपपूजन करण्याचा निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले तरीही मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या सरकारने त्यात कोलदांडा घातला. हे घडू दिले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बेअदबी केली, प्रकरण शेकले तेव्हा आज माफी मागून सरकार मोकळे झालेले आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, या देशात भाजपा वगळता एकाही पक्षाला हिंदू आस्थांशी देणेघेणे नाही. किंबहुना हिंदूंना शक्य तेवढे रगडून मुस्लीमाची मत मिळवण्याकडे त्यांचा कल असतो. हिंदुस्तान हा हिंदू बहुल देश आहे. तरीही इथे हिंदूंना शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या प्रथा-परंपरा जपण्यासाठी त्यांना न्यायालयात लढावे लागते. न्यायालयाने बाजूने निकाल दिल्यानंतरही तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांची सरकारे आडवी येतात. हिंदूंच्या पदरात अन्यायच पडेल याची व्यवस्था करतात. हिंदूंची न्याय्य बाजू उचलून धरणाऱ्या न्यायाधीशांची बदनामी केली जाते. तामिळनाडूतील ‘किर्तिगाई दिपम्’ या उत्सावानिमित्त याची ताजी प्रचिती आलेली आहे. या ताज्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत राज्याचे ख्रिस्ती मुख्यमंत्री विजय जोसेफ.
