घरक्राईमनामापुणे कोर्टाबाहेरील हल्ला प्रकरणी सहा आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी

पुणे कोर्टाबाहेरील हल्ला प्रकरणी सहा आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी

जमिनीच्या वादातून कट रचल्याचा संशय

पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींच्या चौकशीसाठी १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने सहाही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंदार किवळे याचे वकील शुभांगी परुळेकर यांनी न्यायालयातील सुनावणीनंतर ही माहिती दिली.

या हल्ल्यात वापरण्यात आलेली शस्त्रे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत. आरोपींकडील बंदुका जप्त करणे, हल्ल्यामागील नेमके कारण शोधणे आणि या कटाचा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच, या घटनेमागे जमिनीच्या वादातून रचलेले कटकारस्थान असण्याची शक्यता वकील शुभांगी परुळेकर यांनी व्यक्त केली. हल्ल्याचे नियोजन करणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी आरोपींची अधिक चौकशी होणे गरजेचे असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला.

हे ही वाचा:
आयआरसीटीसी घोटाळ्यात आरोप निश्चितीचा आदेश कायम

गुरनूरला संधीचे संकेत; अंशुलच्या पाठीशी मॉर्केल ठाम!

मुंबईने उत्तराखंडला ८६ धावांनी लोळवले!

माहीममधील ज्वेलर्सवर गोळीबारामागे १० कोटींच्या खंडणीचा डाव!

दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक चारजवळ सहा जणांनी मंदार किवळे याच्यावर आधी गोळीबार केला. गोळी चुकल्यानंतर हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात मंदारचे दोन्ही हात गंभीर जखमी झाले असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, २०२५ मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे. शुभमचा भाऊ अक्षय चव्हाण याने या हल्ल्याचा कट रचल्याची आणि त्यासाठी अन्य तरुणांना एकत्र केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे आता सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत या हल्ल्यामागील संपूर्ण कट, शस्त्रांचा पुरवठा आणि मुख्य सूत्रधार याबाबत कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version