घरक्राईमनामामाहीममधील ज्वेलर्सवर गोळीबारामागे १० कोटींच्या खंडणीचा डाव!

माहीममधील ज्वेलर्सवर गोळीबारामागे १० कोटींच्या खंडणीचा डाव!

पी.सी. जैन ज्वेलर्सचे मालक भरत जैन यांना तीन वेळा धमकीचे मेसेज

माहीम येथील पी.सी. जैन ज्वेलर्स या दुकानावर बुधवारी सायंकाळी झालेल्या गोळीबारामागे १० कोटी रुपयांच्या खंडणीचा वाद असल्याचे धक्कादायक वास्तव तपासातून समोर आले आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोन हेल्मेटधारी हल्लेखोरांनी दुकानावर तीन गोळ्या झाडल्यानंतर वांद्र्याच्या दिशेने पळ काढला होता. या घटनेनंतर माहीम पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, दुकानाचे मालक भरत जैन यांना यापूर्वी सातत्याने खंडणीसाठी धमकीचे संदेश पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे.

भरत जैन यांना १८ ऑक्टोबर रोजी पहिला धमकीचा संदेश आला होता. अनोळखी क्रमांकावरून फोन आल्याने त्यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारा संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी पुन्हा धमकीचा संदेश आला. ‘रेडी रखना चमत्कार छाया’ असा मजकूर या संदेशात होता. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना आणखी एक धमकीचा संदेश पाठवण्यात आला. अशा प्रकारे आतापर्यंत तीन वेळा त्यांना धमकावण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
हे ही वाचा:
संविधानाचा गळा घोटणारेच लाल पुस्तकाच्या नावाने करतायत जनतेची दिशाभूल

तिजोरीत खडखडाट, तरी चर्चना ख्रिसमससाठी ३० हजार!

डॉलरच्या तेजीला रुपयाने दिले आव्हान

संविधान कमकुवत करणाऱ्यांच्याच हाती पाच दशके सत्ता

‘रामजी ज्यादा दिमाग मत चला, तेरी जन्म कुंडली है, झेड प्लस सिक्युरिटी लगा बी रख, पैसा तुझे देना होगा, यमराज जी को देखना, १० करोड देना होगा,’ अशा शब्दांत भरत जैन यांना शेवटच्या संदेशातून धमकावण्यात आले होते. झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असली तरी पैसे द्यावेच लागतील, असा इशाराही या संदेशातून देण्यात आला होता. हे संदेश स्पॅम असावेत, असा संशय आल्याने जैन यांनी सुरुवातीला त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, बुधवारी दुकानावर गोळीबार झाल्यानंतर या धमक्यांचे गांभीर्य वाढले आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी धमकीचे संदेश, त्यासाठी वापरण्यात आलेले मोबाइल क्रमांक आणि हल्लेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. दहा कोटींच्या खंडणीसाठीच हा गोळीबार करण्यात आला का, तसेच या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास माहीम पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version