घरक्राईमनामाईडीकडून रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध चार्जशीट

ईडीकडून रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध चार्जशीट

लंडनमध्ये राहणाऱ्या फरार डिफेन्स डीलर संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) चार्जशीट दाखल केली आहे. ही दुसरी सप्लीमेंटरी चार्जशीट धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात दाखल करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, PMLA अंतर्गत वाड्रा यांचे निवेदन यावर्षी जुलै महिन्यात नोंदवण्यात आले होते. या सप्लीमेंटरी चार्जशीटवरील सुनावणी ६ डिसेंबरला होणार असून या प्रकरणात रॉबर्ट वाड्रा हे नववे आरोपी बनले आहेत. अद्याप कोर्टाने या चार्जशीटवर संज्ञान घेतलेले नाही.

ईडीने वाड्रा यांच्या विदेशातील आर्थिक व्यवहारांवर आणि फरार डीलर संजय भंडारीशी संबंधित प्रॉपर्टींवरील त्यांच्या कथित कनेक्शनवर आरोप ठेवले आहेत. भंडारीवर आधीपासूनच विदेशात बेनामी मालमत्ता लपवण्याचे आरोप आहेत. संजय भंडारी २०१६ मध्ये भारतातून पळून गेला, त्यानंतर दिल्लीतील एका न्यायालयाने त्याला भगोडा आर्थिक गुन्हेगार घोषित केले. ईडीची चौकशी २०१६ मध्ये भंडारीवर करण्यात आलेल्या इन्कम टॅक्स रेडपासून सुरू झाली. या रेडमध्ये वाड्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी असलेल्या लिंकचे संकेत देणारे ईमेल आणि दस्तऐवज मिळाल्याचा दावा आहे.

हेही वाचा..

ट्रोलर्सना मुक्क्याचा मार : नूपूरचे विश्व मुक्केबाजी स्पर्धेत सुवर्ण यश

रशियाला उत्तरी समुद्र मार्गावर हवाय भारताचा वावर चीनचीही नजर

डेफलिंपिक्स २०२५: माहित संधूची कमाल! तिसरे पदक जिंकत लिहिला नवा इतिहास

… आणि पंतप्रधान मोदींनी पुन्हा बिहारमध्ये ‘गमछा’ फिरवला

ईडीने यापूर्वीही भारतातील अनेक प्रॉपर्टीज अटॅच केल्या आहेत, ज्यांचा संबंध वाड्रा किंवा त्यांच्या संबंधित संस्थांशी असल्याचे सांगितले जाते. त्यांचा दावा आहे की या प्रॉपर्टीज भंडारीच्या ऑफशोर डीलिंग्समधून मिळालेल्या गैरव्यवहारातून आलेल्या पैशातून खरेदी करण्यात आल्या. दरम्यान, ईडीने एका विशेष न्यायालयाला सांगितले की वाड्रा यांना गुरुग्राममधील एका चुकीच्या जमीन व्यवहारातून ५८ कोटी रुपये मिळाले. यातील ५३ कोटी रुपये स्काय लाइट हॉस्पिटॅलिटी आणि ५ कोटी रुपये ब्लू ब्रीज ट्रेडिंगच्या माध्यमातून आले.

ईडीच्या म्हणण्यानुसार, या पैशांचा वापर वाड्रा यांनी अचल मालमत्ता खरेदी, इन्व्हेस्टमेंट, कर्ज देणे आणि त्यांच्या ग्रुप कंपन्यांची देणी फेडण्यासाठ केल्याचे आढळले. चौकशीच्या दरम्यान केंद्रीय एजन्सीने ३८.६९ कोटी रुपये मूल्याच्या ४३ अचल प्रॉपर्टीज अंतरिमरित्या जप्त केल्या. या प्रॉपर्टीज थेट किंवा अप्रत्यक्षपणे गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेतून खरेदी झाल्याचे सांगितले आहे. ईडीने ज्या प्रॉपर्टीज जप्त केल्या त्यात: राजस्थानातील बीकानेर येथील जमीन, गुरुग्रामच्या गुड अर्थ सिटी सेंटरमधील युनिट, मोहालीच्या बेस्टेक बिझनेस टॉवरमधील युनिट, अहमदाबादच्या जय अंबे टाउनशिपमधील निवासी युनिट यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version