घरक्राईमनामाहिंदूद्वेष्ट्या उस्मानी विरोधात गुन्हा दाखल

हिंदूद्वेष्ट्या उस्मानी विरोधात गुन्हा दाखल

हिंदूविरोधी गरळ ओकणाऱ्या जिहादी विचारांचा शर्जील उस्मानी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शर्जील उस्मानी विरोधात जालना येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटरवर पोस्ट करून प्रभु श्रीरामांची बदनामी केल्याप्रकरणी उस्मानी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीचा पूर्व विद्यार्थी नेता उस्मानी हा कायमच आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतो. या वर्षाच्या सुरुवातीला उस्मानीने पुण्यात येऊन हिंदू समाजाला सडलेले असे म्हणत वाद ओढवून घेतला होता. तर काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांच्या निधनानंतर आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे उस्मानी विरोधात टीकेची झोड उठली होती. आता पुन्हा एकदा उस्मानीने हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्रीरामांची बदनामी केल्याप्रकरणी तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा राहुल द्रविडकडे

केंद्र सरकारची प्रणाली असताना राज्याचा ‘जिरायती’ खर्च कोणासाठी?

२६/११च्या हल्ल्याला चोख जवाब देणारा जवान गमावला

जालना येथील अंबादास आंबोरे यांनी शर्जील विरोधात भावना दुखावल्याची तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आता उस्मानी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ अ अन्वय उस्मानी विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. जालना येथील अंबड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अंबादास आंबोरे हे ,हिंदू जागरण मंच’ या संस्थेशी जोडले गेले असून या मंचाच्या माध्यमातूनच उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आधी एल्गार परिषद घेऊन हिंदू विरोधी गरज उठल्यामुळे उस्मान विरोधात पुण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version