घरक्राईमनामाजोगेश्वरीतील सात मजली इमारतीत मीटर कॅबिनला आग

जोगेश्वरीतील सात मजली इमारतीत मीटर कॅबिनला आग

११ जण जखमी, आग आटोक्यात आणली

जोगेश्वरी (पश्चिम) येथील वैशाली नगर परिसरातील गोमती वैशाली चाळ या सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील कॉमन मीटर कॅबिनमध्ये शुक्रवारी पहाटे आग लागून ११ जण जखमी झाल्याची घटना घडली. मुंबई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ५.५९ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. ही आग कॉमन मीटर कॅबिनमधील विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे व संबंधित स्थापनेपुरती मर्यादित होती. अग्निशमन दलाने सकाळी ६.१८ वाजता आग पूर्णपणे विझवली.सुरुवातीला दोन जणांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार, एकूण ११ जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी सात पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.

जखमींपैकी सलीम नूर महद्दीन तडवी (७५) आणि मुमताज सलीम तडवी (६७) यांना भाजल्यामुळे पुढील उपचारांसाठी
कूपर रुग्णालय येथे हलविण्यात आले. उर्वरित नऊ जणांवर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

साई सुदर्शनचा शतकांचा सपाटा

सिया गोयल, चेतन चौधरीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सोफी एक्लेस्टोनचा विश्वविक्रम!

भारताचा कच्च्या तेलाचा साठा वर्षभरातील उच्चांकावर

जखमींची नावे;(ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल):
युसूफ मिठा (५५), समीरा मिठा (५५), इरफान मिठा (४६), बिलकिस मिठा (७०), मोहम्मद अमीर मिठा (८०), हुसा मिठा (४०), इरफा मिठा (१३), मेहरागीझ बटावाला (६४) आणि अली आझाद बटावलकर (३३).

अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासानुसार, आग विद्युत वायरिंग आणि मीटर कॅबिनमधील उपकरणांमधून लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ धुराचे प्रमाण वाढले होते. सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version