घरक्राईमनामाभीक मागण्यासाठी सीएसएमटीतून चिमुरडीचे अपहरण:१२तासांत सुखरूप सुटका

भीक मागण्यासाठी सीएसएमटीतून चिमुरडीचे अपहरण:१२तासांत सुखरूप सुटका

रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात आईच्या कुशीत गाढ झोपेत असलेल्या अवघ्या एका वर्षाच्या चिमुरडीचे भीक मागण्यसाठी अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. मात्र रेल्वे गुन्हे शाखेने या अपहरणाचा १२ तासात छडा लावून आरोपी महिलेला दिव्यातून अटक करून चिमुरडीची सुखरुप सुटका केली आहे.

या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपहरणकर्त्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

पूजा शिंदे (२२)असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.पूजा ही दिवा पूर्व येथे पतीसोबत राहण्यास आहे.नशापाणी करणारी पूजा ही भुरटी चोऱ्या करीत होती. तिच्यावर शहर पोलीस ठाण्यात चोरीचा एक गुन्हा दाखल असल्याची माहिती रेल्वे गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे उस्मानाबाद
(धाराशिव) येथील रहिवासी असलेले रघु पवार व त्यांची पत्नी गौरी पवार (वय २०) हे सध्या घाटकोपर परिसरातील रमाबाई आंबेडकर नगरात मजुरी करून राहतात. १५ ऑक्टोबर रोजी रात्री गावी जाण्यासाठी ते आपल्या एक वर्षाच्या मुलीसह लातूर एक्सप्रेस पकडण्याकरिता सीएसएमटी स्थानकात आले होते. मात्र, गाडी चुकल्याने त्यांनी फलाट क्रमांक १२/१३ समोरील मेनलाइन हॉलमधील स्टीलच्या बाकड्यांशेजारी रात्र काढण्याचा निर्णय घेतला.

१६ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आईने बाळाला दूध पाजले व त्या पुन्हा झोपी गेल्या. त्यानंतर पहाटे ५.२५ च्या सुमारास जाग आली असता, कुशीत झोपलेली चिमुरडी बेपत्ता असल्याचे दांपत्याच्या लक्षात आले. स्थानकात शोधाशोध करूनही मुलगी न सापडल्याने त्यांनी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका महिलेने बाळाला अलगद उचलून पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

या घटनेची गंभीरपणे दखल घेत सीएसएमटी रेल्वे पोलिस आणि रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने स्टेशन परिसर व रेल्वे मार्गांवर संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली. दरम्यान मुंबई तसेच ठाणे,दिवा, मुंब्रा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले असता संशयित महिला ही दिवा स्थानकावर चोरलेले बाळ घेऊन जाताना आढळून आली. गुन्हे शाखेने दिवा परिसरात शोध घेऊन तिला दिव्यातून ताब्यात घेऊन तिच्या ताब्यात असलेल्या चिमुरडीची सुखरूप सुटका केली.

दरम्यान,आरोपी पूजा शिंदे हिने मुलाची ओळख पटू नये म्हणून तिचे केस कापून टाकले होते, तसेच चोरलेले चिमुरडीचा वापर भीक मागण्यासाठी करण्यात येणार होता अशी माहिती समोर आली आहे.लोहमार्ग गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपी पूजा शिंदे आणि तिच्याजवळून सुटका केलेल्या चिमुरडीचा ताबा सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांकडे देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version