घरक्राईमनामाससूनमधील पंचतारांकित सुविधांसाठी ललित पाटील मोजत होता १७ लाख रुपये

ससूनमधील पंचतारांकित सुविधांसाठी ललित पाटील मोजत होता १७ लाख रुपये

उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात वास्तव्य

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कदायक बाबी समोर येत आहेत. ललित पाटील याचा रुग्णालयातील मुक्काम चांगलाच चर्चेत आला आहे. तीन वर्षांच्या येरवडा कारागृहातील काळात तो तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात राहिला होता. ससून रुग्णालयात ललित पाटील याला पंचतारांकीत हॉटेलप्रमाणे सर्व सुविधा मिळत होत्या अशी माहिती समोर आली आहे. एका कैद्याला इतक्या सुविधा कशा मिळाल्या? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या तपासातून मिळाले आहे.

ललित पाटील हा उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात राहत होता. पण, ललित पाटील हा ड्रग्स प्रकरणातील कैदी तीन वर्षांत रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आराम करत होता. शिवाय त्याच्या मर्जीने हवे तसे कुठेही फिरत होता. रुग्णालयातून हॉटेलमध्ये जात होता. धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी ललित पाटील महिन्याला १७ लाख रुपये देत होता. पोलीस तपासात ललित पाटील याने ही माहिती दिली आहे. १६ नंबर वार्डात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तो हे पैसे देत होता.

हे ही वाचा:

अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!

बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!

मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या

बीएमडब्ल्यू हॉटेलमध्ये घुसली, ऑस्ट्रेलियातील पाच भारतीय वंशाचे नागरीक मृत

याशिवाय ललित पाटील इनोव्हा कारमधून पुणे शहरात फिरत होता. तसेच कैदी असताना मॉलमध्ये जाऊन खरेदी करत होता. बिर्याणीचे पार्सल घेण्यासाठीही जात होता. यामुळे या सर्व चौकशीनंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. ललित पाटीलच्या या सुविधा पाहता त्याला मदत करणारे पोलीस कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दहा पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. परंतु, बडतर्फीची कारवाई अजून कोणावर झाली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version