घरक्राईमनामापाकिस्तानस्थित पाच दहशतवाद्यांच्या जमिनी जप्त

पाकिस्तानस्थित पाच दहशतवाद्यांच्या जमिनी जप्त

रियासी जिल्ह्यात पोलिसांची कारवाई

पाकिस्तानात राहून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना मदत करणाऱ्या पाच जणांच्या जमिनी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. रियासी जिल्ह्यातील या पाच जणांच्या मालकीची सुमारे १.७ हेक्टर जमीन जप्त करण्याचे आदेश पोलीस महासंचालक नलिन प्रभात यांनी दिले आहेत. हे पाचही जण पाकिस्तानातून लष्कर-ए-तोयबासाठी काम करत असून, दहशतवादी कारवायांसाठी शस्त्रे, दारूगोळा आणि आर्थिक मदत पुरवत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

माहितीनुसार, अल्ताफ दीन, गुलाम मोहम्मद, मोहम्मद अशरफ, शबीर अहमद आणि बहार दीन अशी या पाच जणांची नावे आहेत. हे सर्वजण रियासी जिल्ह्यातील रहिवासी असून, अनेक वर्षांपूर्वी पाकिस्तानात गेले होते. तेथे त्यांनी शस्त्रे आणि दारूगोळा हाताळण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

तपासादरम्यान हे पाचही जण पाकिस्तानातून लष्कर-ए-तोयबासाठी काम करत असल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. ते जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी शस्त्रे, दारूगोळा आणि आर्थिक मदत पुरवत असल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, स्थानिक तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कामही ते करत असल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

अमेठीत ख्रिस्ती धर्मांतर करणाऱ्या १० जणांच्या टोळक्याला अटक

होर्मुझच्या सामुद्रधुनीत चार तेलवाहू जहाजांना आग

चीनच्या अंतराळ मोहिमेत पाकिस्तानी अंतराळवीराचा सहभाग

अमेरिकेचा भारतासह १६ देशांना टॅरिफचा इशारा

जमीन विकून दहशतवादासाठी निधी उभारण्याचा संशय

पोलिसांच्या तपासात संबंधित पाच जण त्यांच्या मालकीच्या जमिनी विकण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळले. या जमिनींच्या विक्रीतून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाण्याची शक्यता असल्याने ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या जमिनींमध्ये अलफ दीन यांची सात कनाल, गुलाम मोहम्मद यांची १० कनाल ११ मरला, मोहम्मद अशरफ यांची १७ मरला, शबीर अहमद यांची सात कनाल तीन मरला आणि बहार दीन यांची आठ कनाल एक मरला जमीन आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version