घरक्राईमनामामानखुर्द: दुर्गा मूर्ती घेऊन जाणाऱ्या भक्तांवर मुस्लिम जमावाकडून मारहाण; मूर्तीची तोडफोड!

मानखुर्द: दुर्गा मूर्ती घेऊन जाणाऱ्या भक्तांवर मुस्लिम जमावाकडून मारहाण; मूर्तीची तोडफोड!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळाला दिली भेट

मुंबईतील मानखुर्द येथे इस्लामिक कट्टरपंथीयांनी दुर्गा देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. ही घटना रविवारी (२१ सप्टेंबर ) रात्री १० वाजता घडली. तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली.

भाविकांच्या म्हणण्यानुसार, ते ढोल वाजवत दुर्गा देवीच्या घोषणा देत जात होते. दरम्यान, मूर्ती मशिदीजवळून घेऊन जात असताना, तलवारी आणि काठ्या घेऊन मुस्लिम जमाव तेथे आला. या लोकांनी दुर्गा देवीच्या भक्तांना मारहाण केली आणि मूर्तीचे नुकसान केले. घटनेनंतर परिसरात तणाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि चौकशी केल्यानंतर आरोपींना अटक केली.

हे ही वाचा : 

 “युपीत ‘ऑपरेशन कलावा’: लव्ह जिहाद पीडितांना परत आणण्यासाठी ‘नवदुर्गा टास्क फोर्स’”

पूनम पांडे मंदोदरीची भूमिका साकारणार नाही!

मनीष तिवारी यांच्या पोस्टनंतर भाजपने राहुल गांधींना केले लक्ष्य

अमित शाह, अजित डोभाल यांच्या नावे केले बनावट कॉन्फरन्स कॉल आणि…

किरीट सोमय्या यांनी घटनास्थळाला भेट दिली. ते पोस्टकरत म्हणाले- दुर्गामाता मंदिर, साठे नगर येथे देवीचे आज (२३ सप्टेंबर) दर्शन घेणार आहे. (बाबा साहेब आंबेडकर चाळ अण्णा भाऊ साठे नगर, लल्लूभाई कंपाऊंड जवळ मानखुर्द ) नवरात्र सुरू होण्यापूर्वी काही धर्मांध अतिरेकी गुंडांनी दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता.

घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते म्हणाले, पोलिसांनी आराबाज शेख, पप्पू , आरामान, साहिब, मुजीब, मुस्तफा, इब्बो, रियाज सलीम सह दहा आरोपींना अटक केली आहे. अरबाज शेख हा तडीपार आरोपी असून त्याच्यावर MTDP अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version