घरक्राईमनामा'बुरखा घातला नाही म्हणून केलेली हिंदू तरुणीची हत्या हा लव्ह जिहादचा प्रकार'

‘बुरखा घातला नाही म्हणून केलेली हिंदू तरुणीची हत्या हा लव्ह जिहादचा प्रकार’

आमदार अतुल भातखळकर यांनी केली टीका

- Advertisement -

हिजाब किंवा बुरखा घालत नाही म्हणून मूळच्या हिंदू पत्नीला गळा चिरून मारण्याचे घृणास्पद कृत्य इक्बाल शेख याने केल्याचे वृत्त आहे. टिळकनगर येथे घडलेल्या या घटनेचा लव्ह जिहाद या दृष्टिकोनातून तपास होऊन दोषीला कठोरात कठोर शासन व्हायला हवे अशी मागणी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, सदर तरुणी ही मूळची हिंदू होती. पण तिला या इक्बाल शेखने विवाह झाल्यानंतर वारंवार मुस्लिम चालीरीतींचे पालन करण्याची सक्ती केली. पण तिने तसे करण्यास नकार दिला. तिने बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आली?त्यामुळे माझी अशी मागणी आहे की या सगळ्या घृणास्पद प्रकाराची लव्ह जिहादच्या दृष्टीने चौकशी व्हावी, तपास व्हावा आणि इक्बाल शेखला कठोर शासन व्हावे.

हे ही वाचा:

शिवभोजन थाळी बंदचा निर्णय नाही

सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली, शिंदेंना दिलासा

अंकुर राऊत, शोभा शिंपी यांनी भरले अर्ज

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाने घेतले ७५ जणांचे बळी

टिळकनगर येथे झालेल्या या गुन्ह्यात या तरुणीने इक्बाल शेखशी विवाह केला होता. त्याचा आधीही एक विवाह झाला होता. मात्र पहिल्या बायकोला त्याने सोडले होते. आता मात्र ही हिंदू मुलगी असल्याने त्याने मुस्लिम रिवाजाप्रमाणे बुरखा घालण्याची सक्ती तिच्यावर केली पण तिने नकार दिला. त्यामुळे ते एकमेकांपासून वेगळे राहू लागले. मात्र रागाच्या भरात इक्बाल शेखने त्या तरुणीवर चाकुने हल्ला करत तिला ठार केले.

पोलिस यासंदर्भात तपास करत आहेत. लव्ह जिहादच्या अशा अनेक घटना देशभरात मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे अशा प्रकारांना वेळीच आळा घातला जावा आणि सर्वांनीच अशा प्रकारांच्या बाबतीत सजगता बाळगावी अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version