घरक्राईमनामाआम्ही निष्पक्ष यंत्रणा आहोत, आमच्यावरील आरोप खोटे!

आम्ही निष्पक्ष यंत्रणा आहोत, आमच्यावरील आरोप खोटे!

- Advertisement -

एनसीबीने पत्रकार परिषदेतून दिली कारवाईची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)आणि त्यांचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्यानंतर एनसीबीनेही या कारवाईची सविस्तर माहिती देतानाच आपल्यावर होत असलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे म्हटले.

अर्थात एनसीबीने मलिक यांच्या आरोपांना सविस्तर उत्तरे देण्यापेक्षा आपली कारवाई कशी चालली आहे आणि त्यातून गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा कसा उद्देश आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

एनसीबीचे अधिकारी या पत्रकार परिषदेत म्हणाले की, लोकांच्या माहितीवर आम्ही कारवाई करत आहोत. एनसीबी खूप प्रामाणिकपणे काम करत आहे. लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कॉर्डेलिया क्रूझवर आम्ही कारवाई केली. यावेळी अनेक प्रकारचे ड्रग्स सापडले होते.  सुमारे १ लाख ३० हजार रोकडही सापडली. यासंदर्भात आमच्याकडे ९ साक्षीदार आहेत. गोसावी आणि भानुशाली हे देखील साक्षीदार आहेत. पकडलेल्या कुणालाही आम्ही बेकायदेशीर वागणूक दिली नाही.

लवकरच आरोपपत्र

एनसीबीने पुढे सांगितले की, १४ लोकांना आम्ही एनसीबी कार्यलयात आणले होते. त्याचा तपास आम्ही केला, त्यांचा जबाब नोंदवला. नंतर ८ लोकांना अटक केली आणि ६ लोकांना सोडून दिलं. पंचनाम्यात सर्व मुद्दे आले आहेत. लवकरच आम्ही आरोपपत्र दाखल करू. बाकी १० जण न्यायालयीन कोठडीत आहेत. आम्ही ६ फॉलोअप रेड केल्या आहेत. ८ लोकांना ज्यांना क्रूझवर अटक केली,  ते सध्या तुरुंगात आहेत. ज्या १० लोकांना अटक केली आहे त्यात १ परदेशी नागरीक आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं ड्रग्स जप्त केले आहे. हे ड्रग्स तरुणांना व्यसन लावण्यासाठी आणले जात होते. पण आमच्यावर जे आरोप करण्यात येत आहेत ते बिनबुडाचे आहेत, खोटे आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version