घरक्राईमनामाजादूटोण्याच्या संशयावरून व्यक्तीची हत्या, गुप्तांग कापून मृतदेह धरणात फेकला!

जादूटोण्याच्या संशयावरून व्यक्तीची हत्या, गुप्तांग कापून मृतदेह धरणात फेकला!

ओडिशातील घटना

ओडिशाच्या गजपती जिल्ह्यात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांच्या एका गटाने एका ३५ वर्षीय व्यक्तीची हत्या करून त्याचे गुप्तांग विकृत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी त्या व्यक्तीचा गळा दाबून त्याची हत्या केली आणि त्याचे गुप्तांग कापून मृतदेह जवळच्या हराभंगी धरणात टाकला.

रविवारी (३ ऑगस्ट) सकाळी जलाशयातून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गावकऱ्यांना असा संशय आहे की, दोन आठवड्यांपूर्वी गावातील महिलेचा मृत्यू हा काळ्या जादूमुळे झाला होता. मोहना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मालासापदर गावात शनिवारी रात्री ही घटना घडली.

जी उदयगिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश चंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की, या घटनेसंदर्भात १४ गावकऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, स्थानिकांकडून धमक्या आल्यानंतर तो माणूस त्याच्या कुटुंबासह गाव सोडून गंजम जिल्ह्यातील त्याच्या सासऱ्याच्या घरी गेला होता. त्याने त्याच्या मेहुण्याला त्याच्या जनावरांची काळजी घेण्यास सांगितले होते.

मात्र, शनिवारी पीडित व्यक्ती आपली गुरेढोरे आणि शेळ्या घेण्यासाठी गावात परतला असता त्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास आणि कारवाई करत आहेत.

हे ही वाचा : 

येमेनमध्ये बोट बुडाल्याने ६८ निर्वासितांचा मृत्यू!

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन!

मुख्तार अन्सारीच्या मुलाला ‘या’ प्रकरणात अटक!

दिल्ली पोलिसांनी ‘बंगाली’ला बांगलादेशी भाषा म्हटल्याचा तृणमूलचा दावा, भाजपचे प्रत्युत्तर!

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version