घरविशेषयमुनेत आता जलसफर; ‘नमो यमुना रिव्हर सफारी’ आजपासून सुरू

यमुनेत आता जलसफर; ‘नमो यमुना रिव्हर सफारी’ आजपासून सुरू

सोनिया विहार ते जगतपूरदरम्यान ६ किलोमीटरचा क्रूझ प्रवास

दिल्लीच्या पर्यटनविश्वात आजपासून एका नव्या आकर्षणाची भर पडणार आहे. यमुना नदीतून क्रूझ सफर करण्याची संधी आता दिल्लीकरांना आणि पर्यटकांना मिळणार आहे. दिल्ली सरकारकडून ‘नमो यमुना रिव्हर सफारी’ ही पहिली मनोरंजनात्मक क्रूझ सेवा सुरू करण्यात येत आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते मंगळवारी (१० नोव्हेंबर) सोनिया विहार येथे या सेवेचे उद्घाटन होणार आहे.

कसा असेल क्रूझचा प्रवास?

ही क्रूझ सेवा यमुना नदीवरील सोनिया विहार ते जगतपूर या मार्गावर चालवली जाणार आहे. या प्रवासाचे अंतर अंदाजे ५ ते ६ किलोमीटर असून एका फेरीसाठी सुमारे ३५ ते ४५ मिनिटे लागतील. एका क्रूझमध्ये एकावेळी ३० प्रवासी प्रवास करू शकतील. या सफरीसाठी प्रतिव्यक्ती ५०० रुपये तिकीट निश्चित करण्यात आले आहे. क्रूझमधून प्रवाशांना यमुना नदी आणि दिल्लीच्या परिसराचे वेगळे दृश्य अनुभवता येणार आहे.

या क्रूझचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती विद्युत ऊर्जेवर चालणार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करणाऱ्या आणि पर्यावरणपूरक जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लाइफ जॅकेट आणि सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेसारख्या सुविधाही उपलब्ध असतील.

अनेक सरकारी संस्थांचा सहभाग

या प्रकल्पाची जबाबदारी भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाकडे (IWAI) असून केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने तो विकसित करण्यात आला आहे. दिल्ली विकास प्राधिकरण (DDA), दिल्ली पर्यटन आणि परिवहन विकास महामंडळ, दिल्ली जल मंडळ तसेच दिल्ली सरकारच्या सिंचन आणि पूर नियंत्रण विभागाचाही या प्रकल्पात सहभाग आहे.

हे ही वाचा:

ट्रम्प म्हणतात संघर्ष संपला; इराण म्हणतो शरण या!

मोदी-झेलेन्स्की यांच्यात शांततेच्या प्रयत्नांवर चर्चा

‘गोकुळ’ची निवडणूक होणार… स्थगितीची मागणी फेटाळली

डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी वधारला

यमुना नदीला राष्ट्रीय जलमार्ग कायदा २०१६ अंतर्गत राष्ट्रीय जलमार्ग-११० म्हणून घोषित करण्यात आले आहे. या जलमार्गाचा पर्यटन आणि मनोरंजनासाठी वापर करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. क्रूझ सेवा सुरू करण्यापूर्वी गेल्या महिन्यात संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चाचणी फेऱ्याही घेण्यात आल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version