घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसोनिया गांधी हेच विदेशी टूलकिट!

सोनिया गांधी हेच विदेशी टूलकिट!

काँग्रेस नेते विदेश दौऱ्यावर गेले की, परतताना ते कोणते टूलकिट घेऊन येणार, याबाबत चर्चा असते. परंतु, खरे टूलकिट त्यांचे पिताश्री राजीव गांधी विदेशात घेऊन आले होते. सोनिया गांधी हे त्या टूलकिटचे नाव! सत्तेची सूत्रे हाती असताना आणि नसताना सोनिया गांधी यांनी सतत हिंदूविरोधाचे, मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र येऊ घातलेले आहे. त्या निमित्ताने विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध होत आहेत. या मुलाखतीमधून त्यांचा हिंदूविरोधी चेहरा पुन्हा एकदा ठसठशीतपणे पुढे येत आहे. विवाहानंतर १५ वर्षांनी त्यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले. १९८३ मध्ये त्या खऱ्या अर्थाने कागदोपत्री भारतीय झाल्या. परंतु, भारतीयत्वाशी अजूनही त्यांची नाळ जुळलेली नाही. त्यांची मानसिकता घनघोर हिंदूविरोधी आहे. म्हणूनच, १८ मे २००४ हा दिवस भारतासाठी सुदिन म्हणावा लागेल, ज्या दिवशी सोनिया गांधी देशाच्या पंतप्रधान होणार नाहीत, यावर अखेरचे शिक्कामोर्तब झाले. ‘द गार्डियन’ या ब्रिटीश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी जे काही मनोगत व्यक्त केले आहे, ते पाहता त्यांच्या पुस्तकात काय असेल याची कल्पना करता येईल. या मुलाखतीत हिंदुत्व, संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सोनियांच्या मनात ठासून भरलेला द्वेष स्पष्ट दिसतो. अयोध्येतील बाबरी ढाचा हेच त्यांच्या दृष्टीने सर्वधर्मसमभावाचे स्मारक होते, हेही उघड होते. आज हाती कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना सोनिया मुसलमानांची चाटुकारिता करण्यात किंवा हिंदूंच्या भावना दुखावण्यात कुठेही कमतरता करताना दिसत नाहीत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version