घरक्राईमनामालालबागमध्ये आईची निर्घृण हत्या करणारी तरुणी होती सँडविच विकणाऱ्याच्या संपर्कात

लालबागमध्ये आईची निर्घृण हत्या करणारी तरुणी होती सँडविच विकणाऱ्याच्या संपर्कात

मुलीने केली होती आईची निघृण हत्या

लालबाग हत्येप्रकरणी मुलीनेच आईची निघृण हत्या केल्याप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. या तरुणीने आपल्या आईची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले होते. त्या परिस्थितीत त्याच खोलीत ती बराच काळ राहात होती.

काळाचौकी पोलिसांच्या पथकाने या प्रकरणी उत्तर प्रदेशमधून एकाला अटक केली आहे. आता या तरुणाची चौकशी होत आहे. २३ वर्षीय तरुणीने आपल्या आईची निघृण हत्या केली आणि  तिच्या  मृतदेहाचे तुकडे केले. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लालबाग इथल्या इब्राहिम कासम इमारतीमधील वीणा जैन या ५३ वर्षीय महिलेची त्यांच्या २३ वर्षीय मुलीने रिंकल जैन हिने हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी आईची हत्या झाल्यानंतर रिकंल ही लालबागमधल्या सॅन्डविच विकणाऱ्या तरुणाच्या संपर्कात होती, असे समोर आले आहे. पोलिसांनी याच आधारावर तपास करत उत्तर प्रदेशातून एक संशयित तरुण ताब्यात घेतला आहे. आता त्याची मुंबईत चौकाशी केली जाणार आहे.

काय आहे घटना?

लालबाग मधल्या इब्राहिम कासम इमारतीमधील वीणा जैन वय ५३ या बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा भाऊ आणि भाचीने पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर लालबाग पोलिसांनी तपास केला असता महिलेच्याच घरांत मृतदेहाचे तुकडे कुजलेल्या अवस्थेत सापडले या तपासावरून वीणा जैन यांची मुलगी रिंकल जैन हिने आईची हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करताना आईचा मृतदेह कुजल्यावर त्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून आरोपी मुलीने १०० सेंटच्या बाटल्या आणि एअर फ्रेशनरच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. आता पोलीस अधिक तपास करत   आहे.

हे ही वाचा:

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिंकल जैन राहत असलेल्या घरांत कुजलेला मृतदेह पोस्टमोर्टमसाठी के. ई. एम. रुग्णालयांत पाठवण्यात आला असून रुग्णालयातून शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. पोस्टमोर्टम अहवालानंतर वीणा जैन यांची हत्या कशाप्रकारे करण्यात आली त्याचा उलगडा लवकरच होईल. याशिवाय वीणा जैन यांच्या मृतदेहाचे सिटी स्कॅन सुद्धा करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version