घरक्राईमनामानसरापूर बालिका अत्याचार प्रकरणी नागरिकांनी अडवला मुंबई सातारा महामार्ग

नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणी नागरिकांनी अडवला मुंबई सातारा महामार्ग

पुण्याच्या नसरापूर येथील चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरणी आता नागरिकांनी मुंबई सातारा महमार्ग अडवून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांनी आरोपीवर तातडीने कारवाई करुन या बालिकेला न्याया द्यावा अशी संतप्त मागणी केली. अखेर रात्री उशीरा पोलिसांनी नागरिकांना हुसकावून लावत वाहतूक सुरु केली आहे. फाशी द्या, फाशी द्या अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली होती.

 नसरापूर येथे एका चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करुन तिची ६५ वर्षीय विकृताने दगडाने निर्घृण हत्या केली. त्यामुळे महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. या मुलीवर अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षीय आरोपी नराधम भीमराव कांबळे याला अटक झाली आहे. या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टाने तातडीने खटला चालवून फाशी देण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवले जाईल, अशी भूमिका व्यक्त केली.

हे ही वाचा:

कांकेरमध्ये भीषण IED स्फोट; 3 DRG जवान शहीद

प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

थॉमस कपमध्ये इतिहास! फ्रान्स प्रथमच उपांत्य फेरीत; भारताशी भिडणार

 

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकली तिच्या आजीकडे सुट्टीनिमित्त आली होती. तिला वासरु दाखवतो असे सांगून या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला आणि तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

 

या प्रकरणी ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र,त्याला अशाच गुन्ह्यात जामीन झाल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. नागरिकांनी शनिवारी सायंकाळपासून मुंबई- सातारा हायवे रोखून धरला आहे.आंदोलक नागरिक पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

गेली तीन ते चार तासांपासून मुंबई सातारा हायवेवर नागरिकांनी हे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनामुळे मुंबई सातारा एक्सप्रेस हायवे वरील वाहतूक गेल्या अनेक तासापासून ठप्प आहे.नागरिकांना हटवण्यासाठी अखेर रात्री पोलिसांनी कारवाई करीत नागरिकांना हुसकावून लावण्यास सुरुवात केली.

नसरापूर प्रकरणातील मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत रास्ता रोखो केल्याने अनेक वाहने खोळंबली होती.त्यामुळे पोलिसांनी अखेर या नागरिकांना हुसकावून लावल्याने अखेर वाहतूक हळूहळू सुरु झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version