घरक्राईमनामा२४ वर्षे घरकाम करणाऱ्या नोकरानेच साफ केले सचिन अहिरांचे घर

२४ वर्षे घरकाम करणाऱ्या नोकरानेच साफ केले सचिन अहिरांचे घर

घरी झाली होती २ कोटी ६५ लाखांची चोरी

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानावरून तब्बल २ कोटी ६५ लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी प्रविण सोलंकी (४५) या मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून, धक्कादायक म्हणजे हा आरोपी गेल्या २४ वर्षांपासून अहिर यांच्या घरी कामाला असल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने केलेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने आरोपीला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपी प्रवीण सोलंकी याने चोरीचा काही माल विकून त्यातून मिळालेले पैसे आपापसात वाटून घेतल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान ऐवज जप्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हे ही वाचा:

मंत्रालयात इंटर्नशिपची सुवर्णसंधी

नाशिककरांसाठी हक्काच्या घराची मोठी संधी

८वा वेतन आयोग : पगार आणि पेन्शनवाढीच्या चर्चांना वेग

ITR भरण्यासाठी अवघे सहा दिवस

दुसरीकडे, बचाव पक्षाच्या वकिलांनी हा सर्व दावा फेटाळून लावला असून, आरोपीवर राजकीय दबावापोटी किंवा वैयक्तिक कारणातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, चोरीची घटना घडल्यानंतर परिसरातील CCTV फुटेजमध्ये जाणीवपूर्वक फेरफार (डेटा छेडछाड) करण्यात आल्याचा संशय असून, पोलीस त्या दिशेनेही कसून तपास करत आहेत.

या हाय-प्रोफाइल चोरीच्या प्रकरणात केवळ एकच व्यक्ती सामील नसून त्याचे इतर काही साथीदारही असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या विविध टीम्स फरार आरोपींचा आणि चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा युद्धपातळीवर शोध घेत असून, या प्रकरणातील अनेक छुपे दुवे लवकरच उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version