घरक्राईमनामापुण्यात मद्यधुंद अवस्थेत बसचालकाने चालवली उलटी बस!

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत बसचालकाने चालवली उलटी बस!

संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती

पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात पीएमपीएल बस चालकाने १५ गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली. शहरातील सेनापती बापट रोडवर असलेल्या वेताळबाबा चौकामध्ये या चालकाने बस चालवत १५ गाड्यांना उडवले. मद्यधुंद अवस्थेत त्याने हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.यामध्ये बस चालक बस उलटी चालवत मागे पुढे करत आहे व बसमधील प्रवासी भीतीने मदतीसाठी आरडाओरड करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सेनापती बापट रोडवर वेताळबाबा चौकामध्ये ही घटना घडली.या बस मध्ये ३० हुन अधिक प्रवासी प्रवास करत होते. पीएमपीएल बस चालकाने बेजाबदारपणे बस चालवत १०- १५ वाहनांना उडवल्याची माहिती आहे.बस मागे पुढे करत त्याने वाहनांना धडक दिली.त्यानंतर कृष्णा जाधव या तरुणाने बस चालकाचा पाठलाग करत बसची काच फोडली आणि बस चालकाला पकडण्यात आले.

हे ही वाचा:

पुण्यात विमान कोसळलं, तीन जण जखमी!

बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

निलेश सावंत असे या बस चालकाचे नाव आहे.त्याला पकडण्यात आल्यानंतर त्याने मद्यप्राशन केल्याची माहिती समोर आली.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.या प्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.परंतु पुणेकरांना थोडा वेळ संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले.

संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती
निलेश सावंत याने रविवारी केलेल्या प्रकारामुळे पुणे शहरात २०१२ मध्ये घडलेल्या संतोष माने प्रकरणाची आठवण झाली. संतोष माने याने दारुच्या नशेत २५ जानेवारी २०१२ मध्ये स्वारगेट स्थानकातून पीएमटीची बस काढली. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते. संतोष माने याला या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली होती.मात्र त्यांनतर फाशीची शिक्षा रद्द करत न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version