घरक्राईमनामाबनावट पोलीस अधिकाऱ्याने ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून केली हत्या!

बनावट पोलीस अधिकाऱ्याने ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून केली हत्या!

पोलीस अधिकारी सांगत केले अपहरण, पुण्यातील घटना

पोलीस अधिकारी असल्याचे सांगत पुण्यातील एका ६५ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्या व्यक्तीला बेदम मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे.पुण्यातील तळेगाव दाभाडे, चिंचवड, टाकवे या परिसरात ही घटना घडली आहे.

पुण्यामध्ये एका बनावट पोलीस अधिकाऱ्याने ६५ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण करून त्याची हत्या केली.याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना तत्काळ अटक केली आहे.ही घटना तळेगाव दाभाडे, चिंचवड, टाकवे या परिसरात घडली आहे.या हत्येमागे आर्थिक कारण असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

हे ही वाचा:

मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं

ललित पाटीलसह त्याच्या १२ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

भारत- श्रीलंका सामन्यादरम्यान ११ विक्रम

‘मुली, मी तुला आशीर्वाद देतो, तुझे नाव लिही. मी तुला नक्की पत्र लिहीन’

श्रीकृष्ण उद्धवराव टकले (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी टाकवे येथील शिवाजी राजाराम गरुड (६५) आणि तळेगाव दाभाडे येथील अनिल शिवलिंग कोळी (४५) अशी अटक करण्यात आली आहे.तळेगाव दाभाडे येथील रहिवासी किरण शंकर खोल्लम (वय ४८) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत तक्रार दिली.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टकले हे फिर्यादी खोल्लम यांचे सासरे होते. टकले हे खोल्लम यांच्या निवासस्थानी असताना, आरोपींनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी टकले यांना ताब्यात घेत असल्याचे सांगून वाहनात बसवले. मात्र, त्यांनी टकले यांना चिंचवड येथील गरुड यांच्या मुलीच्या घरी नेऊन त्यांना बेल्टने बेदम मारहाण केली यात त्यांचा मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version