मुंबई उच्च न्यायालयातील वकील असल्याचा दावा करणाऱ्या रुखसाना सय्यद या महिलेला सौदी अरेबियात गरबाचे आयोजन केल्याबद्दल पोटदुखी झालेली आहे. ‘Advocate Ms Alvi’ या नावाने सदर महिला एक्स अकाउंट चालवते. तिने १७ ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियामध्ये गरबा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारी पोस्ट केली. तिने पोस्टमध्ये लिहिले की, सौदी अरेबियातील जेद्दाह येथे एका हिंदू कुटुंबाला ‘हराम’ गरबा कार्यक्रमाला जाताना दाखवणारी रील पाहून तिचे मन व्यथित झाले.
“ही रील पाहिल्यावर माझे मन व्यथित झाले. ही मुस्लिमांची पवित्र भूमी आहे, जिथे इस्लाम आला, जिथे प्रेषित मोहम्मद यांचा जन्म आणि पालनपोषण झाले आणि जिथे कुराण अवतरले. त्याच ठिकाणी त्यांनी अशा सर्व हराम कृत्यांना सुरुवात केली,” असे अल्वी यांनी लिहिले.
गरबा कार्यक्रमांविरोधात सौदी अरेबियाच्या प्रशासनाकडून प्रतिसाद आणि कारवाई व्हावी, असा स्पष्ट प्रयत्न करत ऍड. मिस अल्वी यांनी सौदीच्या न्याय मंत्रालयाला, आरोग्य मंत्रालयाला तसेच भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला (ओआयसी) टॅग केले.
विशेष म्हणजे, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी, विशेषतः हिंदूंनी, पोस्ट केलेल्या व्हिडिओतील हिंदू कुटुंबाविरोधात असलेल्या त्यांच्या कथित कट्टरतेवर, असहिष्णुतेवर आणि सूचक विरोधावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर अॅडव्होकेट मिस अल्वी यांनी आपली भूमिका आणखी आक्रमक केली. त्यांनी हिंदूंसाठी अपमानास्पद भाषेचाही वापर केला.
मक्का या संपूर्ण शहरात गैर-मुस्लिमांना प्रवेश बंद असल्याचे ज्ञात असले तरी, ज्या गरबा कार्यक्रमाला हे हिंदू कुटुंब जाणार असल्याचे सांगितले जात आहे, तो जेद्दाह येथे आयोजित करण्यात येणार होता. जेद्दाह हे मक्केपासून बरेच दूर आहे. याचा अर्थ असा होतो की अॅडव्होकेट मिस अल्वी यांच्या मते संपूर्ण सौदी अरेबियाच ‘पवित्र भूमी’ आहे आणि त्यामुळे इतर धर्मांचे उत्सव आयोजित करण्यास परवानगी दिली जाऊ नये, कारण ते इस्लाममध्ये “हराम” मानले जातात.
“अरे वेड्यांनो, ही आमची ‘पवित्र जागा’ आहे…!! त्याचा अर्थ समजतो का? इस्लाम हा नृत्य, संगीत आणि या सर्व गोष्टींना परवानगी देत नाही, त्यामुळे मला शिवीगाळ करणे थांबवा. ज्यांचे सण मशिदींसमोर मुजरा केल्याशिवाय, दारू प्यायल्याशिवाय आणि महिलांचा विनयभंग केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत, असे लोक मला शिकवण देत आहेत, हे किती धाडसाचे आहे,” असे त्यांनी लिहिले.
हे ही वाचा:
‘त्या’ पद्धतीने रिजिम चेंजवर आमचा विश्वास नाही!
टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपींचे धागेदोरे हाती; फडणवीसांची माहिती
पंजाबच्या संगरूरमध्ये मनरेगाच्या २३ मजुरांना कारने चिरडले
सलमान रश्दी कॉक्रोचच्या प्रेमात, मीरा नायर कॉक्रोचची ‘आई’
मथुरा, अयोध्येत मुस्लिमांना बंदी घातली तर?
गंमत म्हणजे, रुखसाना सय्यद, ज्यांना ऍडव्होकेट मिस अल्वी म्हणूनही ओळखले जाते, इस्लामच्या उगमाची ‘पवित्र’ भूमी असल्याचे सांगून सौदी अरेबियात नवरात्री किंवा गरब्यासारख्या हिंदू सणांच्या उत्सवावर बंदी घालण्याची मागणी करतात. मात्र, जेव्हा त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की हिंदूंसाठी पवित्र असलेल्या अयोध्या, मथुरा, काशी किंवा इतर ठिकाणी मुस्लिमांनाही प्रवेशबंदी असावी का, तेव्हा त्यांनी प्रत्युत्तर दिले, “भारत हा लोकशाहीवादी देश आहे..!!”
सौदी अरेबिया गैर-मुस्लिम किंवा काफिरांना संपूर्ण मक्का शहरात तसेच इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांच्या मशिदीच्या ‘पवित्र’ परिसरात कायमस्वरूपी प्रवेशबंदी घालतो. या धार्मिक विशेषाधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी तपासणी नाके, व्हिसा नियम, रस्त्यांवरील तपासणी आणि कठोर कायदे आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड, देशातून हकालपट्टी आणि त्याहून कठोर शिक्षांना सामोरे जावे लागू शकते.
सौदी अरेबिया संपूर्ण देशात चर्च, हिंदू मंदिरे किंवा सार्वजनिक स्वरूपातील गैर-इस्लामी धार्मिक उपासनेसाठीच्या स्थळांच्या बांधकामाला परवानगी देत नाही. अनेक इस्लामी किंवा मुस्लिमबहुल देश कायद्याद्वारे मंदिरे आणि गैर-इस्लामी प्रार्थनास्थळांच्या बांधकामावर निर्बंध घालतात किंवा त्यांच्यावर होणाऱ्या सातत्यपूर्ण हल्ल्यांकडे दुर्लक्ष करतात. पाकिस्तानमध्ये काही मोजकी मंदिरे वगळता, बहुतांश जुनी हिंदू मंदिरे एकतर उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, त्यांची विटंबना करण्यात आली आहे किंवा त्यांच्यावर मुस्लिमांनी कब्जा करून त्यांचा इतर कारणांसाठी वापर केला आहे.
