न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी आणि चित्रपट निर्मात्या मीरा नायर हे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) प्रेमात पडल्याची कबुली त्यांनी दिली आहे. भारतातील तरुणांमध्ये संताप असल्याचा आसुरी आनंद या दोघांना आहे.
सलमान रुश्दी यांनी भारतातील परिस्थितीचा उल्लेख करत तरुणांच्या आंदोलनामुळे आशा निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी ‘कॉकरोच’ या आंदोलनाच्या नावाचाही उल्लेख केला. दुसरीकडे, मीरा नायर यांनी स्वतःचा उल्लेख ‘कॉकरोच मॉम’ असा करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
भारतीय वंशाचे प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांना हे आंदोलन हवेहवेसे वाटते , “भारतामध्ये असंतोषाची धग वाढत आहे” असे म्हणत भारतीय तरुणांचे कौतुक रश्दी करतात. रश्दी यांना या आंदोलनातून आशा निर्माण झाली आहे. ते म्हणतात, “भारताच्या तरुणांनी आम्हाला खूप काळानंतर आशेचा सर्वात आशादायी क्षण दिला आहे.” ‘सॅटॅनिक व्हर्सेस’चे लेखक रश्दी यांनी न्यूयॉर्क शहरात हे वक्तव्य केले.
हे ही वाचा:
नालासोपारा लव्ह जिहादप्रकरणी आरिफविरोधात आणखी एक तरुणी
स्वाती मोहिते यांना केशवसृष्टी पुरस्कार
‘स्कूल ठीक करो’ अभियानामुळे फ्रान्समध्ये पेटला वणवा…
हार्दिक पंड्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही!
CJP आंदोलनकर्ते मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही संस्थांच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या आंदोलनाला मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाठिंब्यामुळे त्याच्या राजकीय भूमिकेवरूनही चर्चा सुरू झाली आहे. लोकशाहीमध्ये सरकार आणि घटनात्मक संस्थांना प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार असला, तरी आंदोलनकर्त्यांनी केलेल्या आरोपांची सत्यता पुराव्यांच्या आधारे तपासणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे सलमान रुश्दी आणि मीरा नायर यांच्या समर्थनामुळे CJP आंदोलनाला प्रसिद्धी मिळाली असली, तरी त्यातील आरोप आणि मागण्यांचे मूल्यमापन स्वतंत्रपणे होणे आवश्यक आहे.
