घरक्राईमनामासपा खासदार बर्क यांच्या मेव्हण्यावर बलात्काराचा गुन्हा

सपा खासदार बर्क यांच्या मेव्हण्यावर बलात्काराचा गुन्हा

डॉ. जैद वारसी याच्यावर जबरदस्ती गर्भपात केल्याचा देखील आरोप

उत्तर प्रदेशातील संभल जिल्यातील एका खासगी रुग्णालयातील नर्सवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात समाजवादी पक्षाचे खासदार जियाउर रहमान बर्क यांचे मेव्हणे डॉ. जैद वारसी यांच्यावर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याचे गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून डॉ. जैद वारसी आणि त्याचे वडील मोहम्मद असलम यांच्या विरोधात एफआयआर नोंदवली आहे.

पीडिता मोरादाबाद जिल्यातील कुंदरकी पोलीस ठाणे हद्दीत राहणारी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे तिने डिसेंबर २०२२ मध्ये संभल येथील चौधरी सराय भागातील ‘बिस्मिल्लाह’ रुग्णालयात नोकरी सुरू केली होती. त्यादरम्यान डॉ. वारसी याने तिला रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर राहण्यासाठी खोली दिली. पीडितेचा आरोप आहे की, “१५ डिसेंबर २०२२ रोजी तब्येत बिघडल्यावर डॉ. वारसी तिच्या खोलीत आला आणि त्याने तिला औषध दिले, ज्यामध्ये नशेचे पदार्थ मिसळलेले होते. औषध घेतल्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि त्या दरम्यान आरोपीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले.”

दुसऱ्या दिवशी हे फोटो-व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यात आले आणि नोकरीतून काढून टाकण्याची तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार करण्यात आला. पीडितेने पुढे असा आरोप केला की, “ती गर्भवती झाल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले.” तसेच तिला नैनीताल, हल्द्वानी, बरेली आणि रामपूर यांसारख्या शहरांत नेऊन सातत्याने शोषण करण्यात आले.

हे ही वाचा:

अनेक संस्थांना १,००० हून अधिक बनावट धमकीचे संदेश पाठवणारा गजाआड

इराणकडून कुवैतच्या वीज, जल प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू

अमेरिका खर्ग बेट ताब्यात घेणार? काय म्हणाले ट्रम्प?

अभिनेता विजयने आपल्या वाहनचाहकाच्या मुलाला दिले तिकीट

गेल्या वर्षी १९ ऑगस्ट रोजी तिने नोकरी सोडली आणि मोरादाबादमध्ये काम सुरू केले. मात्र, त्यानंतरही आरोपीने ब्लॅकमेल करून तिचे शोषण सुरूच ठेवले, असा आरोप आहे. तक्रारीनुसार, गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी आरोपीने तिला पुन्हा संभल येथे बोलावून बलात्कार केला आणि जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या दिल्या. सततच्या शारीरिक आणि मानसिक अत्याचारामुळे तिची प्रकृती खालावू लागली. अखेरीस तिने संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली. आई-मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दाखल केली. ठाणे प्रभारी गजेंद्र सिंह यांनी सांगितले की, “पीडितेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पुराव्यांच्या आधारे आवश्यक कारवाई करण्यात येईल.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version