घरक्राईमनामाअवघ्या ६०० रुपयांवरून राडा; मालाडमध्ये सहा-सात जणांवर अ‍ॅसिडफेक

अवघ्या ६०० रुपयांवरून राडा; मालाडमध्ये सहा-सात जणांवर अ‍ॅसिडफेक

इमिटेशन ज्वेलरी पॉलिश करणाऱ्याकडून गुन्हा

अवघ्या ६०० रुपयांच्या किरकोळ वादातून मालाडमध्ये अ‍ॅसिडफेक झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. इमिटेशन ज्वेलरी पॉलिश करणाऱ्या एका व्यावसायिकाने सहा ते सात जणांच्या टोळक्यावर अ‍ॅसिड फेकल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी समर बहादूर सिंह (३८) याला अटक केली असून, दुसरीकडे मारहाण करणाऱ्या मयूर कनोजिया आणि त्याच्या साथीदारांवरही ‘दंगल’ घडवल्याप्रकारणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मयूर कनोजिया यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय असून, आरोपी समर सिंह पॉलिशचे काम करतो. त्यांच्यातील एका व्यवहारामध्ये कनोजिया यांनी २६ हजार रुपयांऐवजी चुकून ६०० रुपये जास्त दिले होते. हे जास्तीचे पैसे परत मिळावे यासाठी कनोजिया गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा करत होते, मात्र सिंह पैसे देण्यास नकार देत होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

हे ही वाचा:

बेकायदेशीर डोम लाईट्स, सायरनवर पोलिसांची कारवाई

‘वन अविघ्न पार्क’ मधील जैन मंदिरातील चोरीचा उलगडा

झारखंडमध्ये ‘टायगर’चे आत्मसमर्पण!

ट्रम्प-इराण तणावाने बाजारात भूकंप; मोठ्या घसरणीनंतर पुन्हा सावरला शेअर बाजार

बुधवारी दुपारी पाल नगर येथील सिंह याच्या वर्कशॉपवर कनोजिया पैसे मागण्यासाठी गेले असता त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर कनोजिया तिथून निघून गेले आणि दुपारी ४ च्या सुमारास ६-७ जणांचे टोळके घेऊन पुन्हा तिथे परतले. या टोळक्याने सिंहला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाणीने बिथरलेल्या समर सिंहने स्वतःचा बचाव करण्यासाठी वर्कशॉपमध्ये पॉलिशसाठी ठेवलेले सौम्य गंधकाम्ल (सल्फ्युरिक अ‍ॅसिड) समोरच्या गर्दीवर भिरकावले. या हल्ल्यात कनोजिया आणि त्यांचे सर्व साथीदार भाजले आहेत. विशेष म्हणजे, या वादात मध्यस्थी करायला आलेला सिंह याचा भाऊदेखील गंभीररीत्या भाजला असून त्याच्या पाठीला मोठी इजा झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या झटापटीत स्वतः आरोपी सिंहदेखील किरकोळ भाजला आहे.

कुरार पोलिसांनी समर बहादूर सिंह याच्यावर ‘गंभीर दुखापत करणे आणि अ‍ॅसिडचा हल्ला करणे’ या कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तर, सिंह याच्या वर्कशॉपवर जाऊन राडा केल्याप्रकरणी मयूर कनोजिया आणि त्याच्या समर्थकांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version