वृंदावन पंचायत येथील उच्च माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला. शिक्षक एहसान अख्तर याने २ ते ५ ऑक्टोबरदरम्यान इयत्ता अकरावीच्या सहा विद्यार्थिनींना राजगीर येथे सहलीला नेले होते.
ही सहल सरकारी योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आली होती आणि त्यासाठी विद्यार्थिनींच्या पालकांची संमती घेण्यात आली होती, असा दावा शिक्षक एहसान अख्तर याने केला होता. मात्र, या प्रकरणाच्या चौकशीत वेगळीच माहिती समोर आली. शिक्षकाने स्वतःच्या पैशातून या सहलीचा खर्च केला होता आणि शिक्षण विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती, असे तपासात उघड झाले.
या सहलीदरम्यान एहसान अख्तर याने विद्यार्थिनींसोबत अयोग्य वर्तन केल्याचा आणि अश्लील कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सहलीची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. संतप्त गावकऱ्यांनी शिक्षकाला मारहाण केली आणि त्याला शिवीगाळ केली. तसेच शाळेच्या परिसरात गोंधळ घालत टेबल आणि खुर्च्यांची फेकाफेक केली.
हे ही वाचा:
सिराजला वगळण्याचा निर्णय कठीणच
भारताकडून नेपाळला २४ हजार कोटींचे विकास पॅकेज
मिचेल-फिलिप्सची अभेद्य भिंत; भारताचा विजय हुकला!
सोने-चांदीच्या दरातील तेजीमुळे खरेदीला जोर
या प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक कृष्ण भगवान यादव यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांना या अनधिकृत सहलीची माहिती होती, मात्र त्यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवले नसल्याचे निष्पन्न झाले.
याशिवाय शाळेच्या हजेरी रजिस्टरमध्ये आणि परीक्षेच्या प्रक्रियेतही अनियमितता आढळून आली. शाळेच्या व्यवस्थापनासंदर्भातही काही तक्रारी समोर आल्या.
चौकशी अहवालातील निष्कर्ष आणि बिहारचे शिक्षणमंत्री मिथिलेश तिवारी यांच्या निर्देशानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी अमरेंद्र कुमार पांडे यांनी मुख्याध्यापक कृष्ण भगवान यादव आणि शिक्षक एहसान अख्तर या दोघांनाही तात्काळ प्रभावाने निलंबित केले.
जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिक्षकाने विद्यार्थिनींना कोणतीही अधिकृत परवानगी न घेता राजगीर येथे सहलीला नेल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात मुख्याध्यापकांविरोधातही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
