घरक्राईमनामामंदिरातील ४० किलोच्या सिंहासनासह चोर पळाले

मंदिरातील ४० किलोच्या सिंहासनासह चोर पळाले

पोलिसांकडून तपास सुरू

अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात चोरीचे घटना घडल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी श्री सुद्रिकेश्वर महाराजांचे ४० किलो वजनाचे चांदीचे सिंहासन चोरून नेले आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या सिंहासनाची किंमत जवळपास ३० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी पहाटे श्रीगोंदा येथील अमित बगाडे हे सव्वा पाच वाजताच्या सुमारास मंदिरात आले. त्यावेळी चोरी झाल्याचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दरम्यान, मंदिराचे पुजारी रमेश धुमाळ मंदिरात आले. त्यानंतर चोरीचे वृत्त गावात पसरल्यावर ग्रामस्थ मंदिराजवळ जमा झाले. त्यानंतर ४० किलो वजनाचे सिंहासन चोरीला गेल्याचे समजले. याची किंमत जवळपास ३० लाख इतकी होती. दोन चोरटे मंदिरासमोर आले. त्यांनी आपल्या जवळील कटावणीने मंदिराचे कुलूप तोडले आणि मंदिरात प्रवेश करून सिंहासनाची चोरी केली.

पारगाव सुद्रिक येथील ग्रामस्थांनी जवळपास सात कोटी रुपये खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. गावाची सुद्रिकेश्वर महाराजांवर प्रचंड श्रद्धा आहे, सिंहासन चोरीला गेल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत घटनेचा निषेध केला आहे. ५० वर्षांपूर्वी सुद्रिकेश्वर महाराज मंदिराचा कळस देखील चोरीला गेला होता. त्यानंतर चोरीची ही दुसरी घटना आहे. संबंधित चोरट्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

हे ही वाचा:

भारतातील उद्योग संघटना एक राष्ट्र, एक निवडणुकीच्या पाठीशी

‘जे मोदींवर टीका करतात, त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळते’

हल्द्वानी हिंसाचाराप्रकरणी ३० जणांना अटक

मोठा निर्णय! ‘सीआरपीएफ’ची परीक्षा मराठीत देता येणार

याचा निषेध म्हणून दिवसभर गाव बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी घटनास्थळी भेट दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version