घरक्राईमनामाजम्मू- काश्मीर मधून तीन गो तस्करांच्या आवळल्या मुसक्या; हिंदू- मुस्लिम दंगल भडकवण्याचा...

जम्मू- काश्मीर मधून तीन गो तस्करांच्या आवळल्या मुसक्या; हिंदू- मुस्लिम दंगल भडकवण्याचा होता प्रयत्न

पोलिसांनी केली कारवाई

जम्मू- काश्मीरमध्ये पोलिसांना मोठे यश आले असून पोलिसांनी तीन गो तस्करांना अटक केली आहे. तपासातून माहिती समोर आली आहे की, हे गो तस्कर गाईंना मारून हिंदूबहुल भागात फेकत आणि यातून लोकांची माथी भडकवण्याचा आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असत. पोलिसांनी गो तस्करांच्या टोळीतील तीन लोकांना अटक केली आहे. गो तस्करांनी जम्मू काश्मीरमधील नगरोटामध्ये दंगल भडकावण्याचा असाच प्रयत्न केला आणि याचं दरम्यान त्यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी अटक केलेल्या तीन गो तस्करांमध्ये मुखतियार अहमद, तारीक हुसैन आणि आरीफ यांचा समावेश आहे. यांची टोळी गायींना मारून नंतर तुकडे हिंदूबहुल परिसरात टाकत असत. २४ डिसेंबर रोजी यांनी नगरोटा येथील जगती- राजपूर रस्त्यावर गाईंचे मांस फेकले. काही वेळातच स्थानिक लोक तिकडून ये जा करताना त्यांना दुर्गंधी आल्याने आजूबाजूला पाहिले असता त्यांना एक गाय आणि वासरू मृतावस्थेत दिसले. काही वेळातच ही बातमी आजूबाजूच्या परिसरात पसरली आणि स्थानिक हिंदू लोकांनी आणि हिंदू संघटनांशी संबंधित सदस्यांनी घटनास्थळी धाव घेण्यास सुरुवात केली.

पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळताच स्थानिक एसएचओ परवेज सज्जाद त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. यानंतर आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले. एका फुटेजमध्ये नोंदणी क्रमांक २१९५ असलेला ट्रक ओळखून आला आणि याचाच आधार घेत पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. ट्रकच्या नंबरद्वारे पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

हे ही वाचा : 

सुप्रिया सुळे म्हणतात, मी यापूर्वी चार निवडणुका ईव्हीएमवर जिंकल्या

राहुल गांधी मस्साजोग न जाण्याची ही आहेत कारणे…

विनोद कांबळी म्हणाला, ही चूक पुन्हा होणार नाही!

अरविंद केजरीवाल यांना घरचा अहेर, महिला सन्मान योजनाच अस्तित्वात नसल्याचा गौप्यस्फोट

अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी मुखतियार हा काश्मीरमधील अनंतनागचा रहिवासी आहे, तर आरिफ आणि तारिकचे घर जम्मूच्या रियासी भागात आहे. या सर्वांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या चौकशीत तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांचा ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वीही या तिघांनी मिळून एक मेलेली गाय जगती परिसरात फेकून दिली होती. त्यानंतर संतप्त हिंदूंनी या घटनेचा निषेध केला. गाई फेकून हिंदू- मुस्लिम दंगल भडकवायची होती, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version