केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान अरुणाचल प्रदेशच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात राज्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासोबतच कायदा-सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ही माहिती दिली.
अरुणाचल प्रदेश हे चीन सीमेलगतचे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे राज्य असल्याने सीमावर्ती भागातील सुरक्षा आणि विकासकामांना या दौऱ्यात प्राधान्य राहण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध विकासविषयक प्रश्न आणि आव्हानांवर केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आढावा बैठक प्रस्तावित आहे.
हे ही वाचा:
अमित देशमुखांकडून टिपू सुलतानचा उदो उदो!
अखिलेश अयोध्येत उतरले तर मीही भिडणार; योगींचा हुंकार!
इस्रायलवरून राहुल गांधींची पलटी
GTA-5 ते GTA-6; मोदींनी मांडला भारताच्या विकासाचा १३ वर्षांचा लेखाजोखा
दरम्यान, राज्यातील ११,२०० मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित सियांग अप्पर मल्टिपर्पज प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध सुरू आहे. प्रकल्पामुळे पर्यावरण, पारंपरिक जमीन आणि स्थानिक समुदायांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाशी संबंधित परिस्थितीही चर्चेत येण्याची शक्यता आहे. दौऱ्यात अमित शाह पोलीस प्रशिक्षण केंद्र, बांदेर्देवा येथे पोलीस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदके प्रदान करणार आहेत. तसेच इटानगरमधील सार्वजनिक कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहणार आहेत. २२ नोव्हेंबरला त्यांचा दौरा संपणार आहे.
