घरविशेषअखिलेश अयोध्येत उतरले तर मीही भिडणार; योगींचा हुंकार!

अखिलेश अयोध्येत उतरले तर मीही भिडणार; योगींचा हुंकार!

अयोध्येत अखिलेश विरुद्ध योगी थेट भिडणार

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अयोध्येतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिल्यावर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी सांगितले की, “जर यादव यांनी तसे केले तर मी देखील त्याच मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करेन. थेट, समोरासमोर लढत होऊ द्या,” असे मुख्यमंत्री आदित्यनाथ जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी पुढे समाजवादी पक्षावर माफिया घटकांवर अवलंबून राहणे, तरुणांच्या रोजगाराच्या संधींमध्ये अडथळा आणणे आणि उत्तर प्रदेशातील महिला व व्यापाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आणण्याचा आरोप केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “हे तेच लोक आहेत ज्यांनी माफियांच्या ताकदीवर उत्तर प्रदेशला पायदळी तुडवले, युवकांच्या रोजगारात अडथळे आणले आणि आपल्या मुली व व्यापाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आणली.”

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर गुंडगिरी, अराजकता, दंगली आणि संचारबंदीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत निशाणा साधला, तसेच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.

हे ही वाचा:

इस्रायलवरून राहुल गांधींची पलटी

GTA-5 ते GTA-6; मोदींनी मांडला भारताच्या विकासाचा १३ वर्षांचा लेखाजोखा

ट्रम्प यांच्या पक्षाला पैसा पुरवणे मूर्खपणा

जगाला वेड लावणाऱ्या ‘GTA 6’च्या निर्मितीत १,६०० भारतीयांचा हात

“जर कोणी माफियागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर त्या माफियाला धुळीत मिळवायला फार वेळ लागणार नाही. समाजवादी पक्ष म्हणजे गुंडगिरी, अराजकता, दंगे आणि संचारबंदी. प्रत्येक माफिया त्यांचा मित्र आहे आणि त्यांनी नेहमीच जनतेचा विश्वासघात केला आहे. जसे कुत्र्याची शेपटी कधीही सरळ करता येत नाही, त्याचप्रमाणे या गुंडांना आणि माफियांना कायद्याच्या बळाने सरळ केल्याशिवाय सुधारता येणार नाही, आणि आमचे सरकार नेमके तेच करत आहे. आम्ही त्यांची गुंडगिरी रोखली आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यावर फास आवळण्याची तयारी करत आहोत,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी थेट निशाणा साधला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version