लातूरमध्ये काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी टिपू सुलतान जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावल्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात देशमुख यांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तसेच त्यांचा उल्लेख ‘शेर-ए-हिंद’ आणि ‘शहीद’ असा करत गौरव केला. या भूमिकेवरून भाजपाने अमित देशमुख यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
Watch: Congress MLA Amit Deshmukh posts on Facebook, “Yesterday evening, attended the grand Qawwali program organized in Latur by the Sher-e-Hind Shaheed Hazrat Tipu Sultan Public Jayanti Utsav Committee, along with Member of Parliament Dr. Shivaji Kalge and colleagues, and enjoyed the Qawwali singing. On the occasion of the birth anniversary of Sher-e-Hind Shaheed Hazrat Tipu Sultan, Mumbai’s renowned and popular Qawwal, Janab Azeem Naja Sahab, won the hearts of the audience with his powerful Qawwali performances. By singing Qawwalis that also praised the great works of Chhatrapati Shivaji Maharaj and Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar alongside Shaheed Hazrat Tipu Sultan, he delivered a message of social harmony and national unity. Overall, this program, which strengthened the spirit of social accord and secularism (Sarva Dharma Sambhava) through art and music, proved to be truly inspiring. The thoughts of great personalities, their achievements, and the teachings of equality, fraternity, and justice imparted by them are inspiring for the entire society. On this occasion, it was noted that going beyond various religions, castes, and creeds to respect humanity and to strengthen the feelings of love, respect, and trust among one another is the true message of secularism…”
(Video: Amit Deshmukh/Facebook)
— IANS (@ians_india) November 18, 2026
लातूरमध्ये ‘शेर-ए-हिंद शहीद हजरत टिपू सुलतान सार्वजनिक जयंती समारोह समिती’च्या वतीने एका कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार अमित देशमुख यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाची छायाचित्रे आणि व्हिडीओ त्यांनी स्वतःच्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली. पण कार्यक्रमाची छायाचित्रे समोर येताच महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला.
भाजपचा आरोप आहे की, काँग्रेस मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण करत आहे. दुसरीकडे, शिंदे यांच्या शिवसेनेने याला हिंदू समाजाचा आणि महाराष्ट्राच्या थोर पुरुषांचा अपमान म्हटले आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षावर हिंदुत्वविरोधी राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. हिंदूंची हत्या आणि धार्मिक छळ केल्याचा आरोप असलेल्या शासकांचे आणि आक्रमकांचे उदात्तीकरण महाराष्ट्रात सहन केले जाणार नाही, असे ते म्हणाले.
राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनीही या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. “ज्या टिप्याने हजारो हिंदुंची हिंदूंची हत्या केली, धर्मांतर केले आणि इस्लामचा प्रसार करण्यासाठी हिंदू धर्म संपवण्याचे काम केले, त्या टिप्याला मोठे करण्याचे काम काँग्रेसचे नेते सातत्याने करत असतात. त्यांना एक लक्षात येत नाही की, हा टिप्या आज जिवंत असता तर काँग्रेसमधील हे हिंदू नेते, स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक हिंदू म्हणून श्वास तरी घेऊ शकले असते का? कदाचित अमित देशमुख हे विसरले असतील. या हिंदू राष्ट्रात, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात जिहाद करणाऱ्या टिप्याचे उदात्तीकरण केले जात असेल, त्याच्या नावाने पुस्तके वाटण्याची भाषा केली जात असेल, तर हे सहन केले जाणार नाही. औरंग्याला जसे महाराष्ट्राच्या भूमीत गाडले, त्याचप्रमाणे सनातन हिंदू धर्माच्या विरोधात जाणाऱ्यांना आणि टिप्याचे समर्थन करणाऱ्यांना या मातीत गाडण्याची ताकद हिंदू समाजात आहे, हे लक्षात ठेवा.” असा इशाराही मंत्री राणे यांनी दिला.
हे ही वाचा:
अखिलेश अयोध्येत उतरले तर मीही भिडणार; योगींचा हुंकार!
इस्रायलवरून राहुल गांधींची पलटी
GTA-5 ते GTA-6; मोदींनी मांडला भारताच्या विकासाचा १३ वर्षांचा लेखाजोखा
ट्रम्प यांच्या पक्षाला पैसा पुरवणे मूर्खपणा
दुसरीकडे, काँग्रेस पक्षाने अमित देशमुख यांचा बचाव केला आहे. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी भाजपवर पलटवार करत म्हटले आहे की, भाजप प्रत्येक मुद्द्याकडे हिंदू-मुस्लिम तणावाच्या दृष्टिकोनातून पाहते.
