घरधर्म संस्कृतीसाडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे महत्त्व काय?

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे महत्त्व काय?

हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण असा सण

गुढीपाडवा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण असा सण समजला जातो. गुढीपाडवा हा महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे, जो चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला येतो. या दिवशी घराबाहेर गुढी (विजयध्वज) उभारून, कडुनिंबाची पाने आणि साखरेच्या गाठी अर्पण करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांची सुरुवात, सोने खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात.

गुढीपाडवा हा पारंपारिक नवीन वर्षाची सुरुवात दाखवतो. हा वसंत ऋतूचा सण आहे जो नवीन सुरुवात, समृद्धी आणि वाईटावर चांगल्याचा विजय यांचे प्रतीक आहे. एकूणच गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतनवर्ष. या दिवशी घरासमोर गुढी उभारुन तिची पूजा करुन नैवेद्य अर्पण केला जातो.

हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे. प्रभू श्रीराम १४ वर्षे वनवास करुन माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणूनचा या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. दुसरीकडे ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली होती, या कारणामुळे हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस ठरला. अशा अनेक कारणांमुळे गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा आजही जपली जात आहे.

गुढी कशी उभारावी?

बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेच्या धातूचे कलश पालथे घालावे. त्यावर कडुलिंबाची डहाळी, साखरेची माळ, फुलांची माळ बांधावी. सजवलेली गुढी दारासमोर उभारावी आणि गुढीची पूजा करावी. तसेच घरासमोर सुंदर रांगोळी काढून दिवा लावावा. गुढीची मनोभावे पूजा करून पारंपरिक पदार्थांचा नैवेद्यही अर्पण करावा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version