घरदेश दुनिया...नमाज पढायचाय म्हणत त्याने माछरच्या डोक्यात प्रहार केला!

…नमाज पढायचाय म्हणत त्याने माछरच्या डोक्यात प्रहार केला!

स्मितने इस्रायल पंतप्रधान नेतान्याहूना सांगितला घटनाक्रम

फ्लाय दुबईच्या विमानात कॉकपिटमध्ये घडलेल्या थरारक हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आला आहे. भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या संवादात या घटनेची माहिती दिली. दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानाच्या प्रवासादरम्यान सर्व काही सुरळीत सुरू असताना ओमानी को-पायलटने आपल्याला नमाज पठण करायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर काही मिनिटांतच कॉकपिटमध्ये धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली.

कॅप्टन माछर यांच्या माहितीनुसार, को-पायलटने नमाज पठण करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ते नेहमीप्रमाणे विमानाच्या नियंत्रणावर लक्ष केंद्रित करत होते. मात्र, अवघ्या काही मिनिटांत त्यांच्या डोक्यावर मागून जोरदार प्रहार करण्यात आला. सुरुवातीला नेमके काय घडले, हे त्यांना समजले नाही. मात्र त्यानंतर पुन्हा हल्ला झाल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि काही काळ त्यांना स्पष्टपणे दिसतही नव्हते.
हे ही वाचा:
₹८० हजार कोटींच्या पाणबुडी प्रकल्पाला वेग

शिवाजी पार्कमध्ये दिल्या फक्त शिव्या |

माछरने मारली पाचर !

आंदोलनजीवी दिपकेची जरांगे होण्याची प्रक्रिया सुरू…

या हल्ल्याचा थेट परिणाम विमानाच्या उड्डाणावर झाला. विमानाची उंची झपाट्याने कमी होऊ लागली आणि कॉकपिटमध्ये जीवघेणा संघर्ष सुरू झाला. गंभीर जखमी असूनही कॅप्टन मच्छार यांनी विमानावरील नियंत्रण सुटू नये यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. अखेर कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात त्यांना यश आले. दरवाजा उघडल्यानंतर विमानातील क्रू सदस्य आणि इतर वैमानिकांनी तत्काळ कॉकपिटमध्ये प्रवेश करून हल्लेखोर को-पायलटला ताब्यात घेतले.

या संपूर्ण गोंधळात विमानातील सर्व प्रवाशांचे जीव धोक्यात आले होते. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमानाचे सौदी अरेबियातील तबुक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व १८० प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित राहिले. कॅप्टन मच्छार यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर कॅप्टन स्मित माछर यांच्या धैर्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. या संवादादरम्यान मच्छार यांनी कॉकपिटमध्ये नेमके काय घडले, याचा थरारक घटनाक्रम सांगितला. या हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू असून, या घटनेमुळे विमानातील कॉकपिट सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version