घरदेश दुनियावडिलांना भेटू देत नसल्याने इम्रान खान यांच्या मुलाने ठोठावले यूएनएचआरसीचे दार

वडिलांना भेटू देत नसल्याने इम्रान खान यांच्या मुलाने ठोठावले यूएनएचआरसीचे दार

पाकिस्तान सरकारवर आरोप करत केली टीका

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान हे दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. या काळात त्यांना त्यांच्या मुलांना भेटण्याची परवानगी दिली जात नसल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा कासिम खान यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (यूएनएचआरसी)मध्ये हा मुद्दा उपस्थित केला. अधिकाऱ्यांकडून माजी पंतप्रधानांशी होत असलेली वागणूक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार करारांचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला.

इम्रान खान यांना तोशाखाना आणि भ्रष्टाचार प्रकरणात अनुक्रमे १४ आणि १७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून २०२३ पासून ते तुरुंगात आहेत. त्यांच्या अटकेनंतर पीटीआयकडून सतत आरोप करण्यात येत आहेत की, त्यांना हेतुपुरस्सर एकटं ठेवलं जात आहे आणि कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नाही. जानेवारी महिन्यात त्यांना डोळ्यांचा आजार असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय उपचारांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर कासिम खान यांनी यूएनएचआरसीमध्ये हा मुद्दा मांडत सांगितले की, इम्रान खान यांचा मामला हा वेगळा नाही, तर २०२२ नंतर पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या दडपशाहीच्या मोठ्या पॅटर्नचे हे स्पष्ट उदाहरण आहे. त्यांनी राजकीय कैद्यांना ताब्यात ठेवणे, सामान्य नागरिकांवर लष्करी न्यायालयात खटले चालवणे आणि त्यांना शिक्षा देणे, तसेच पत्रकारांना गप्प बसवणे, त्यांचे अपहरण करणे किंवा देशाबाहेर हाकलून देणे यांचा उल्लेख केला.

यावेळी कासिम यांनी फेब्रुवारी २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकांचा उल्लेख करत पीटीआयने केलेले निवडणूक गैरव्यवहाराचे आरोपही पुन्हा मांडले. त्यांनी सांगितले की, जीएसपी प्लस फ्रेमवर्कअंतर्गत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार करारांचे पालन करण्याची बांधिलकी घेतली आहे, ज्यात नागरी आणि राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय करार (ICCPR) आणि संयुक्त राष्ट्रांचे अत्याचारविरोधी करार (UNCAT) यांचा समावेश आहे.

कासिम यांनी दावा केला की, इम्रान खान यांना मनमानीपणे ताब्यात ठेवण्यात आले असून त्यांना एकांतवासात ठेवले जात आहे. त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच त्यांना वैद्यकीय सुविधा नाकारल्या जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. लष्करी न्यायालयात सामान्य नागरिकांवर खटले चालवणे हे देखील संबंधित करारांच्या अटींचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

पर्यटन विभागापासून पोलिसांपर्यंत सर्वांना ‘धुरंधर’ची भुरळ; ‘हा’ डायलॉग प्रचंड ट्रेंडमध्ये

प. बंगालच्या बसीरहाटमधील मतदान यादीतून बीएलओसह ३४० मुस्लिम मतदारांना वगळले

भारताची एलपीजीची गरज भागवण्यासाठी दक्षिण अमेरिकन देशाकडून मदतीचा हात

भारत आमचा मित्र, त्यांना सामुद्रधुनी खुली!

कासिम आणि त्यांचा मोठा भाऊ सुलेमान हे त्यांच्या आईसोबत लंडनमध्ये राहतात आणि वडिलांना भेटण्यासाठी त्यांना पाकिस्तानात जावे लागेल. डिसेंबर २०२५ मध्ये त्यांनी व्हिसासाठी अर्ज केल्याचे आणि जानेवारीत पाकिस्तानला जाण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. मात्र, यापूर्वीही इम्रान खान यांच्या माजी पत्नीने पाकिस्तानी सरकार त्यांच्या मुलांच्या व्हिसा अर्जांना नकार देत असल्याचा दावा केला होता. या संदर्भात कासिम यांनी यूएनएचआरसीमध्ये पुन्हा आरोप केला की, पाकिस्तानी सरकारने “जाणूनबुजून” त्यांचा आणि त्यांच्या भावाचा व्हिसा मंजूर केला नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version