घरदेश दुनियाम्यानमार, नेपाळसोबत भारताचे सामंजस्य करार

म्यानमार, नेपाळसोबत भारताचे सामंजस्य करार

बुधवार, ३० जून रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्यानमार आणि नेपाळ या दोन शेजारी देशांसोबतच्या सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आरोग्य संशोधन क्षेत्रातील हे करार असून परस्पर संशोधनाच्या विषयांमध्ये आरोग्य संशोधन संबंध वाढविणे हे या सामंजस्य कराराचे उद्दीष्ट आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि म्यानमारच्या आरोग्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वैद्यकीय संशोधन विभाग (डीएमआर) यांच्यात झालेल्या करारावर फेब्रुवारी २०२० मध्ये नवी दिल्लीत स्वाक्षरी झाल्या होत्या. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), भारत आणि नेपाळ आरोग्य संशोधन परिषद (एनएचआरसी), नेपाळ यांच्यात अनुक्रमे १७ नोव्हेंबर २०२० आणि ४ जानेवारी २०२१ रोजी भारत आणि नेपाळ यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही करारांची माहिती देण्यात आली. तर मंत्रिमंडळाने या करारांना मान्यताही दिली आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारची उर्दू ‘हौस’

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

संकटात असलेल्या कोकणी माणसाची थट्टा थांबवा

शालेय पाठ्यपुस्तकात होणार ‘ऐतिहासिक’ सुधारणा

भारत-म्यानमार करार
भारत आणि म्यानमार कराराचे मुख उद्दिष्ट लक्षात घेतले तर परस्पर संशोधनाच्या विषयांमध्ये आरोग्य संशोधन संबंध वाढविणे हे आहे. तर यामध्ये संसर्गजन्य रोगांचे उच्चाटन (परस्पर सामंजस्याने निर्णय घेण्यात येईल ) करणे, तथा नवीन, विषाणूजण्य संसर्ग नेटवर्क मंचाचा विकास करणे याचादेखील समावेश करण्यात आला आहे. तर सोबत संशोधन पद्धती व्यवस्थापन, क्लिनिकल चाचण्या, नीतिशास्त्र इ. मधील प्रशिक्षण / क्षमता वाढवणे आणि नियामक यंत्रणेचे सामंजस्य या करारातील काही महत्वाच्या बाबी आहेत.

भारत-नेपाळ करार
भारत नेपाळ कराराची उद्दिष्टे बघायची तर सीमेपलीकडील आरोग्य समस्या, आयुर्वेद/पारंपारिक औषध आणि औषधी वनस्पती, तसेच हवामान बदल आणि आरोग्य, असंसर्गजन्य रोग, मानसिक आरोग्य, लोकसंख्या आधारित कर्करोग रजिस्ट्री, उष्णकटिबंधीय रोग (डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, जेई इत्यादींसारख्या वेक्टर जनित रोग), इन्फ्लूएंझा, क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री, आरोग्य संशोधन नीतीमत्ता, ज्ञान, स्किल टूल्स, विद्यार्थी यांच्या देवाणघेवाणीतून क्षमता निर्मिती आणि साधने, मार्गदर्शक तत्त्वे, प्रोटोकॉल आणि आरोग्य संशोधनाशी संबंधित पद्धती स्वीकारण्यासाठी सहकार्य यासारख्या परस्पर हिताच्या संयुक्त संशोधन उपक्रमांवर सहकार्य ही या कराराची महत्वाची उद्दिष्ट आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version