घरदेश दुनियाअमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

चार दिवस बेपत्ता असलेल्या साकेत श्रीनिवासैयाचा दुर्दैवी अंत

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील बर्कले शहरात २२ वर्षीय भारतीय वंशाचा विद्यार्थी साकेत श्रीनिवासैया यांचा मृतदेह सापडला आहे. ते मागील चार दिवसांपासून बेपत्ता होते. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि मित्रपरिवारात मोठी खळबळ उडाली आहे. साकेत हा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे केमिकल आणि बायोमॉलिक्युलर अभियांत्रिकी विषयात मास्टर्सचे शिक्षण घेत होते. १२ फेब्रुवारी रोजी ते अचानक संपर्काबाहेर गेले. त्यांना शेवटचे बर्कले हिल्स परिसरात पाहण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
हे ही वाचा:
बांगलादेशकडून पंतप्रधान मोदींना शपथविधीचे निमंत्रण

दररोज बिस्किट खाताय? मग हे वाचाच!

गुरुपतवंत सिंह पन्नू  फसलेले स्पेशल ऑप्स? निखिल गुप्ताला शिक्षा, यादवचे काय?

मालेगावच्या उपमहापौरांनी लावला टिपू सुलतानाचा फोटो, वादानंतर हटवला

साकेत बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. शोधमोहीम सुरू असताना त्यांची बॅग एका घराजवळ सापडली. त्या बॅगेत त्यांचा पासपोर्ट, लॅपटॉप आणि काही वैयक्तिक वस्तू होत्या. त्यामुळे पोलिसांनी शोधकार्य अधिक तीव्र केले. अखेर लेक अँझा परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला.

साकेत हा मूळचा कर्नाटकातील बेंगळुरू येथील होते. त्यांनी आयआयटी मद्रास येथून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली होती आणि पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. अभ्यासू आणि शांत स्वभावामुळे ते मित्रपरिवारात लोकप्रिय होते.

या घटनेनंतर सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने अधिकृत निवेदन जारी केले. त्यांनी साकेत यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून सर्व आवश्यक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. मृतदेह भारतात पाठवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, स्थानिक पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून, सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.

ही घटना परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढवणारी ठरली आहे. साकेत यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण भारतीय समुदायातून शोक व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version