घरदेश दुनियाकॅनडामध्ये गुजराती विद्यार्थिनीची निर्घृण हत्या

कॅनडामध्ये गुजराती विद्यार्थिनीची निर्घृण हत्या

परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विधी मेघाचे स्वप्न अधुरे

कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या गुजरातमधील २२ वर्षीय विद्यार्थिनी विधी मेघा हिची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील बोर्सद येथील रहिवासी असलेल्या विधीवर कॅनडातील नियाग्रा परिसरात भरदिवसा चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे केवळ तिच्या कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, विधी मेघा गेल्या चार वर्षांपासून कॅनडामध्ये राहत होती. ती कायद्याचे शिक्षण घेत होती आणि शिक्षणासोबत पार्टटाईम नोकरी करून स्वतःचा खर्च भागवत होती. कॅनडामध्ये कायमस्वरूपी नागरिकत्व म्हणजेच पीआर मिळवण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र १५ मे रोजी ती घराबाहेर पडली आणि त्यानंतर तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला. प्राथमिक तपासात लुटीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
खंडणी, मारहाणीच्या आरोपांनंतर जहांगीर खानच्या निकटवर्तीय नेत्याला अटक 

रशियन तेलावर भारताचा वाढता भर

सोन्याच्या दरांना मोठा धक्का!

कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा

स्थानिक नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात नेले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कॅनडातील पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधीच्या कुटुंबाला या घटनेची माहिती तब्बल १२ दिवसांनंतर मिळाल्याचे समोर आले आहे. १६ मेपासून तिच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते. सुरुवातीला ती अभ्यास किंवा कामात व्यस्त असावी, असे त्यांना वाटत होते. मात्र नंतर अधिकृत माध्यमांतून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची बातमी दिली. ही बातमी ऐकून कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला.

विधीच्या मृत्यूमुळे परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षांत कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले, लूटमार आणि हिंसाचाराच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version