घरदेश दुनियाइराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी ठार

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी ठार

इराणच्या सरकारी माध्यमांनी केली पुष्टी

- Advertisement -

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे (आयआरजीसी) प्रवक्ते अली मोहम्मद नैनी हे ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिका- इस्रायलसोबतच्या युद्धामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात तणाव कायम असून इराणच्या सरकारी माध्यमांनी शुक्रवार, २० मार्च रोजी हे वृत्त दिले आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या लक्ष्यित हल्ल्यात नैनी मारले गेले आहेत, असे सरकारी माध्यमांनी वृत्त दिले. “पहाटे अमेरिकन-झायोनिस्ट बाजूने केलेल्या गुन्हेगारी भ्याड दहशतवादी हल्ल्यात नैनी शहीद झाले,” असे एएफपी वृत्तसंस्थेने गार्ड्सच्या ‘सेपाह न्यूज’ वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार म्हटले आहे.

आयआरजीसी ही इराणची सर्वात शक्तिशाली लष्करी आणि आर्थिक संस्था असून, ती थेट सर्वोच्च नेत्याला अहवाल सादर करते. “आमच्या क्षेपणास्त्र उद्योगाला परिपूर्ण गुण मिळायला हवेत आणि याबाबत कोणतीही चिंता नाही, कारण युद्धाच्या परिस्थितीतही आम्ही क्षेपणास्त्र उत्पादन सुरू ठेवले आहे.” असे नैनी यांनी त्यांच्या हत्येचे वृत्त येण्याच्या काही तास आधी म्हटले होते. नैनी यांनी सांगितले की, युद्धकाळातही इराणचे क्षेपणास्त्र उत्पादन सुरू राहते आणि त्यांच्याकडे कोणत्याही चिंतेशिवाय पुरेसा साठा उपलब्ध आहे.

अली मोहम्मद नैनी यांच्या मृत्यूमुळे या आठवड्यात इराणी नेतृत्वाला चौथा मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांत इराणने तीन अत्यंत प्रभावशाली अधिकाऱ्यांना गमावले आहे. या हल्ल्यांमध्ये माजी संसद अध्यक्ष आणि वरिष्ठ सल्लागार अली लारीजानी, बसिज स्वयंसेवक दलाचे प्रमुख गुलामरेझा सोलेमानी आणि इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब या सर्वांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

दाऊदचा रत्नागिरीतील एक भूखंड विकला गेला १० लाखाला!

इराणच्या तेलावरील निर्बंध अमेरिका हटवणार? काय म्हणाले अमेरिकेचे अर्थमंत्री?

‘इराणची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बनवण्याची क्षमता संपली!’

होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराणचा ट्रान्झिट फीचा प्रस्ताव

दरम्यान, अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांनी पदभार स्वीकारला आहे. अशातच तेही जखमी झाल्याचे वृत्त असून याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. मात्र, इराणमध्ये एक मोठी पोकळी निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version