घरदेश दुनियाहिजाब न घालता गायल्यानंतर इराणी गायिकेला चाबकांच्या फटक्यांची शिक्षा

हिजाब न घालता गायल्यानंतर इराणी गायिकेला चाबकांच्या फटक्यांची शिक्षा

दोन वर्षे परदेश प्रवासासह संगीत क्षेत्रात काम करण्यास बंदी

इराणमध्ये हिजाब न घालता गाणे सादर करणे एका प्रसिद्ध गायिकेला चांगलेच महागात पडले आहे. गायिका परस्तू अहमदी हिला हिजाब न घालता सार्वजनिक कार्यक्रमात गाणे सादर केल्याप्रकरणी ७४ चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तिच्यासोबत काम करणाऱ्या टीममधील चार सदस्यांनाही प्रत्येकी ७४ फटके मारण्यात आले आहेत. इराणमधील कुम शहरात सोमवारी (२३ नोव्हेंबर) या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती तिचे वकील मुस्तफा निली यांनी दिली आहे.

या प्रकरणाची सुरुवात डिसेंबर २०२४ मध्ये झाली होती. परस्तू अहमदी हिने हिजाब न घालता आणि पुरुष संगीतकारांसोबत एका पारंपरिक कारवाँसराय परिसरात गाण्याचा कार्यक्रम सादर केला होता. या कार्यक्रमाचा व्हिडीओ तिने यूट्यूबवर अपलोड केला होता. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले होते. मात्र, इराणमधील महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणे बंधनकारक असल्याने या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला.

यानंतर अहमदी आणि तिच्या टीमविरोधात सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याचा तसेच अश्लील आणि अनैतिक आशय तयार करून तो ऑनलाइन प्रसारित केल्याचा आरोप ठेवण्यात आला. जून २०२६ मध्ये न्यायालयाने अहमदीसह संबंधितांना ७४ फटके मारण्याची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात त्यांनी अपीलही केले होते. मात्र, अपील फेटाळल्यानंतर नोव्हेंबरमध्ये शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.

हे ही वाचा:

लंडनसाठी निघालेल्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर रोखले

१६ डिसेंबरला बांगलादेशात जाण्याची हसीनांची घोषणा

कुर्ला प्रकरणात मारहाण करणाऱ्या मुलांशी संबंधित मदरशाला नोटीस

जेनसन हुआंग यांचे एनव्हिडियामध्ये पुनरागमन

फटके मारण्याच्या शिक्षेसोबतच अहमदी आणि तिच्या चार सहकाऱ्यांवर दोन वर्षांसाठी देशाबाहेर जाण्यास आणि संगीत व कलाक्षेत्रात काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, २०२२ मध्ये महसा अमिनी या तरुणीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये हिजाबसक्तीविरोधात मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर अनेक महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालण्यास सुरुवात केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version