माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या चर्चेदरम्यान बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. राजधानी ढाक्यात अनेक ठिकाणी क्रूड बॉम्बचे स्फोट झाले, तर चट्टोग्राममध्ये माजी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावण्यात आली. वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांमुळे देशातील तणाव वाढला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला असून, ढाक्यात २४ तासांत ५६५ जणांना अटक केली आहे.
चट्टोग्राममधील पंचलाइश परिसरात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास युनूस यांच्या वडिलोपार्जित घराच्या तळमजल्यावरील रिकाम्या खोलीला आग लावण्यात आली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर युनूस यांच्या दोन भावांचे कुटुंबीय राहतात. त्यामुळे घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, ढाक्यात विविध ठिकाणी क्रूड बॉम्बस्फोट आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. गेल्या दहा दिवसांत बांगलादेशातील २८ जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडल्याचे वृत्त आहे. ग्रामीण बँकेच्या ३७ शाखांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. प्रमुख उड्डाणपुलांसह शहराच्या प्रवेशमार्गांवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
हे ही वाचा:
धर्मांतर नव्हे जन्मदरामुळे १० वर्षात मुस्लिम ख्रिश्चनांना मागे टाकणार
दोन आठवड्यांत ‘रामायण’ने कमावले १,५०० कोटी
ब्रह्मोसनंतर आता आकाश, पिनाकाच्या खरेदीत फिलिपाइन्सला स्वारस्य
सावरकरांच्या केलेल्या अपमानावरून शिवसेनेने सोनियांचे पुस्तक फाडले
शेख हसीना यांच्या परतीवरून राजकीय संघर्ष
शेख हसीना ५ ऑगस्ट २०२४ पासून भारतात वास्तव्यास आहेत. डिसेंबरमध्ये मायदेशी परतण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यांच्या अवामी लीग पक्षाने १९ नोव्हेंबरला देशव्यापी लॉकडाऊनची हाक दिली होती. हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी त्यांच्या अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर देशात राजकीय तणाव वाढला आहे. संवेदनशील भागांत निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून, हिंसाचार रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.
