घरदेश दुनियादहशतवादाचा ‘भस्मासुर’ पाकिस्तानलाच भारी पडतोय!

दहशतवादाचा ‘भस्मासुर’ पाकिस्तानलाच भारी पडतोय!

भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल

पाकिस्तानने ज्या दहशतवादाला वर्षानुवर्षे खतपाणी घातले, तोच दहशतवाद आता पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरला आहे, असा जोरदार हल्लाबोल भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये केला. दहशतवादाचा ‘फ्रँकेन्स्टाईन’ राक्षस पाकिस्तानने स्वतः निर्माण केला आणि आता त्यावरील नियंत्रण पूर्णपणे गमावल्याची टीका भारताने केली. शेजारी देशांमध्ये हिंसाचार घडवून आणणारा हा दहशतवाद आता पाकिस्तानच्या भूमीवरही त्याच पद्धतीने हिंसाचार घडवत असल्याचे भारताने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या सहाव्या समितीच्या बैठकीत भारताचे फर्स्ट सेक्रेटरी रघु पुरी यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाकिस्तान एकीकडे स्वतःला दहशतवादाचा बळी आणि त्याविरोधात लढणारा देश म्हणून सादर करतो, तर दुसरीकडे त्याच दहशतवादी शक्तींना पोसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुरी यांनी पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाच्या जुन्या वक्तव्यांचाही संदर्भ दिला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २०१८ मध्ये दिलेल्या मुलाखतीत मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या कारवायांवर प्रश्न उपस्थित केला होता. ‘नॉन-स्टेट अ‍ॅक्टर्स’च्या नावाखाली अशा संघटनांना सीमापार जाऊन मुंबईत नागरिकांची हत्या करण्याची मुभा देता येईल का, असा सवाल शरीफ यांनी केला होता.

पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीचाही भारताने उल्लेख केला. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी अलीकडेच आपल्या प्रांताला शेजारी देशांपेक्षा पाकिस्तानातील इतर प्रांतांकडून अधिक धोका असल्याचे वक्तव्य केले होते. याचा दाखला देत भारताने पाकिस्तानने उभा केलेला दहशतवाद आता त्याच देशासाठी आव्हान ठरत असल्याचे अधोरेखित केले.

हे ही वाचा:

दुष्काळमुक्तीचा वसा! शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर झटले नाना

पडद्यावर सैनिक साकारला, पुढे कारगिलच्या रणभूमीवर केलेली सेवा

अंबानींवर निशाणा साधला; केंद्राने केला खुलासा

“मी उद्या इथे असेन की नाही, माहीत नाही”

यावेळी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या विजयाच्या दाव्यांवरही टीका केली. भारतीय हल्ल्यांमध्ये नुकसान झालेले हवाई तळ आणि बॉम्बस्फोटांमुळे उद्ध्वस्त झालेल्या धावपट्ट्या जर पाकिस्तानला विजयाचे चिन्ह वाटत असतील, तर त्यावर त्यांना आनंद मानू द्या, असा टोला रघु पुरी यांनी लगावला. पाकिस्तानी लष्कराच्या दाव्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य ठरवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न हे दिशाभूल आणि मानसशास्त्रीय युद्धाचा भाग असल्याचेही भारताने म्हटले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या परिणामांबाबत पाकिस्तानकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version